विजयस्तंभास मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:14+5:302021-01-08T04:54:14+5:30
अंतापूरकर यांची भेट बिलोली : तालुक्यातील हिप्परगा माळ येथील ग्रामस्थांनी आ. रावसाहेब अंतापूरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्या ...
अंतापूरकर यांची भेट
बिलोली : तालुक्यातील हिप्परगा माळ येथील ग्रामस्थांनी आ. रावसाहेब अंतापूरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या. जिल्हा सरचिटणीस गिरधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. शिष्टमंडळात अनेकांचा समावेश होता.
सोनारी येथे चोरी
हिमायतनगर : तालुक्यातील सोनारी येथे भरदिवसा चोरी झाली. चोरट्यांनी सय्यद जहूर सय्यद बाबू यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लांबविली. सय्यद जहूर यांनी प्लॉट घेण्यासाठी म्हणून रक्कम घरात ठेवली होती. हिमायतनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
वाहनांची तपासणी
बिलोली : बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी, हुनगुंदा, मनूर, संगम, नागणी, पिंपळगाव, चिरली, टाकळी, डौर, आरळी, माचनूर, दौलापूर, कोटग्याळ, गंजगाव आदी गावच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर धर्माबाद-बिलोली या मुख्य रस्त्यावर चारचाकी, दोनचाकी वाहनांची पोलीस तपासणी करीत आहेत. याकामी पो.ना. महेश माकूरवार, पोकाँ दिलीप जाधव, तीन होमगार्ड कामाला लागले आहेत.
श्रीमनवार यांचा गौरव
मांडवी : दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रवीण श्रीमनवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष भगवान मारपवाड, विशाल श्रीमनवार, सुभाष आगमेलीवार, गजानन लांबसोंगे, नितीन सुुंकरवार, अशेाक खंदारे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
जमादार शेख यांना पदोन्नती
मुक्रमाबाद : येथील भूमिपुत्र तथा देगलूरच्या उपविभागीय कार्यालयातील पोलीस जमादार खय्युम शेख यांची सहायक फौजदार म्हणून पदोन्नती झाली. शेख हे दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. पदोन्नतीबद्दल शेख यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.
सहा ग्रा.पं. बिनविरोध
मुखेड : मुखेड तालुक्यातील कमळेवाडी ग्रामपंचायतसह सहा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. या अंतर्गत १८ वाॅर्डातील ३७ उमेदवार निवडून आले. त्यात कोळनूर, भगनूरवाडी, हसनाळा, जांब खु., कमळेवाडी, ईटग्याळ प.मु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अन्य काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका अपेक्षित आहेत.
कन्या दिन साजरा
नायगाव : बरबडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती तसेच कन्या दिन साजरा करण्यात आला. तसेच पाटोदा, कहाळा, मांडवी, सोमठाणा, कृष्णूर, सावरखेड, वंजारवाडी, मनूर, रुई, अंतरगाव, वाडी, वजीरगाव या ठिकाणीही फुले जयंती व जागतिक कन्या दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले जयंती
नायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे गटशिक्षणाधिकारी लता कौठेकर यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शा.व्य.स.च्या अध्यक्षा गीता कदम, शीला इंगोले, सरपंच किरण कदम केंद्रप्रमुख मोहन कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गीता लोकरे यांनी केले. कार्यक्रमासाठी वसंत शिंदे, रत्नमाला मोरलवार, माया शिंदे, सुरेश कदम, रत्नप्रभा कोठाळकर, योगीता देशमुख, शुभम इंगोले, संध्या इंगोले, नंदिनी माने यांनी परिश्रम घेतले.