निष्पापांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:14+5:302021-07-21T04:14:14+5:30
मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद ...
मंगळवारी श्री अंगददेवजी यात्री निवासच्या सभागृहात ते बोलत हाते. मनजिंदर सिंघ म्हणाले, होला महल्ला दरम्यान झालेली घटना ही दु:खद होती. घटनेच्या १२० दिवसांनंतरही पोलिस आणि न्यायपालिका निष्पाप नागरिकांना न्याय देवू शकली नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांना घर सोडून पळावे लागत आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पीडित परिवारांच्या महिलांशी संवाद साधून त्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. त्यानंतर संत बाबा नरिंदरसिंघजी यांच्या नेतृत्वात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी भेट घेऊन निष्पाप नागरिकांना सोडण्याची मागणी केली. तांबोळी यांच्यासोबतची भेट समाधानकारक राहिल्याचेही ते म्हणाले. घटनेनंतर अनेक निष्पाप नागरिकांना पोलिसांना पकडले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांची भेट घेऊनही हा मुद्दा उपस्थित केला होता. आयजीच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात सरबजीतसिंह विर्क, इंदरजितसिंह माटी, विक्रमजितसिंघ रॉनी, ॲड. सरबजितसिंघ शाहू, ॲड. अमनपालसिंघ कामठेकर यांची उपस्थिती होती.