नांदेडमध्ये हळदीचं सोनं; आवक कमी होतेय तसा भाव वाढतोय, दर गेला १८ हजारांपार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:18 PM2024-05-29T15:18:37+5:302024-05-29T15:19:26+5:30

शेतकऱ्यांकडील हळद जवळपास ७० ते ८० टक्के थेट बाजारात विक्री करण्यात आली आहे.

Turmeric as a gold rate in Nanded; As the income is decreasing, the price is increasing, the rate has crossed 18 thousand | नांदेडमध्ये हळदीचं सोनं; आवक कमी होतेय तसा भाव वाढतोय, दर गेला १८ हजारांपार

नांदेडमध्ये हळदीचं सोनं; आवक कमी होतेय तसा भाव वाढतोय, दर गेला १८ हजारांपार

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील हळदीची आवक आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे हळदीच्या दराने उच्चांकी घेतली असून, सोमवारी लिलाव बाजारात हळदीला १८ हजार १०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

मागील महिन्यात आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरदिवशी चार ते पाच हजार पोते हळदीची आवक व्हायची. पण, आता शेतकऱ्यांकडील हळद जवळपास ७० ते ८० टक्के थेट बाजारात विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे हळदीची आवक आता कमी झाल्याने दराने उसळी घेतली आहे. मागील महिन्यात हळदीचे भाव १६ हजारांवर स्थिरावले होते. 

मात्र, मेच्या शेवटच्या आठवड्यात सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात कमीत कमी १५ हजार ६०० रुपये, तर जास्तीत जास्त १८ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला, तर सरासरी १६ हजार ८०० रुपयांपर्यंत हळदीची विक्री झाली आहे. येत्या काही दिवसांत हळदीचे दर वाढतील, या आशेने काही मोठ्या शेतकऱ्यांनी हळद साठवून ठेवली आहे. अशा शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळतील, अशी आशा आहे.

Web Title: Turmeric as a gold rate in Nanded; As the income is decreasing, the price is increasing, the rate has crossed 18 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.