अडीच वर्षांनंतर बनारसी देवीची पतीसोबत भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:47 AM2019-01-13T00:47:26+5:302019-01-13T00:47:54+5:30
बिहारच्या मेहसा येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जात असताना रेल्वेस्थानकावर गर्दीमुळे पतीसोबत ताटातूट झाल्यानंतर पनवेल एक्स्प्रेसने ही महिला नऊ महिन्यांपूर्वी नांदेडला आली होती़
शिवराज बिचेवार।
नांदेड : बिहारच्या मेहसा येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जात असताना रेल्वेस्थानकावर गर्दीमुळे पतीसोबत ताटातूट झाल्यानंतर पनवेल एक्स्प्रेसने ही महिला नऊ महिन्यांपूर्वी नांदेडला आली होती़ अंगावर जखमा घेवून फिरणाऱ्या या महिलेला रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी मनोरुग्ण विभागाच्या डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांचा लेकरासारखा सांभाळ केला़ दुसरीकडे डॉक्टर आणि रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नातून त्या महिलेची पतीसोबत भेट घालून देण्यात आली़ पतीला समोर पाहताच या महिलेचा अश्रूंचा बांध फुटला होता़
बनारसी देवी असे मनोरुग्ण महिलेचे नाव आहे़ बिहारमधील मेहंसा गावाजवळ एका खेड्यातील ती रहिवासी आहे़ बनारसी देवी यांच्यावर उपचारासाठी त्यांचा पती मेहंसा येथे घेवून आला होता़ परंतु रेल्वेत गर्दीमुळे या दोघांची ताटातूट झाली़ त्यातच बनारसी देवी दोन वर्षे फिरत होत्या़ नऊ महिन्यांपूर्वी २८ मार्च २०१८ ला त्या पनवेल एक्स्प्रेसने नांदेड रेल्वेस्थानकावर उतरल्या़ तेथेच राहून मिळेल ते खात होत्या़ स्टेशनवरील कोपºयालाच त्यांनी आपला निवारा केला होता़ अंगावर जखमाही होत्या़ दिवसभर स्टेशनवर अंगावर भळभळत्या जखमा घेवून फिरणाºया या महिलेकडे रेल्वे पोलिसांचे लक्ष गेले़ त्यांनी बनारसी देवीला उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी मनोरुग्ण विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते़ बनारसी देवी स्वत:बद्दल काही सांगू शकत नव्हत्या़ परंतु, त्यांच्या भाषेवरुन त्या बिहारी असाव्यात असा अंदाज डॉक्टरांनी काढला़
मानसिक आरोग्य विभागात विभागप्रमुख डॉ़ प्रसाद देशपांडे, सहयोगी प्राध्यापक तथा उपवैद्यकीय अधीक्षक डॉ़प्रदीप बोडके, डॉ़उमेश आत्राम, नर्सिंगच्या कुंभाळकर, वाघ व परिचारिकांनी त्यांचा लेकरासारखा सांभाळ करीत त्यांच्यावर उपचार केले़ त्या बिहारी बोलत असल्यामुळे सर्जरी विभागातील डॉ़ मिश्रा यांची मदत घेण्यात आली़ त्यानंतर बनारसी देवीला दाखल केल्यावेळची कागदपत्रे तपासून त्यावरुन रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला़ रेल्वे पोलिसांनी बनारसी देवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले़ तसेच मेहसा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून बनारसी देवी यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला़ तब्बल २ वर्षे ९ महिन्यानंतर बनारसी देवींची शुक्रवारी आपल्या पतीसोबत भेट झाली़ यावेळी आपल्या पतीला कडकडून मिठी मारत त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता़ या ह्दयद्रावक प्रसंगाने डॉक्टर आणि पोनि़ जाधव यांचेही डोळेही पाणावले होते़
कुटुंबियांनी सोडली होती परतीची आशा
४बनारसी देवी या मनोरुग्ण असून त्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्या परत येण्याची आशा सोडली होती़ बनारसी देवी यांचे पती रोजमजुरी करीत असून आर्थिक स्थितीही बेताचीच आहे़ त्यामुळे बेपत्ता झालेल्या बनारसी देवींचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत होते़
डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न
४बनारसी देवी यांच्या अंगावरील जखमा ब-या झाल्यानंतर त्यांच्या बिहारी बोलण्यावरुन डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ नऊ महिन्यांपूर्वीची कागदपत्रे तपासून रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला़ त्यानंतर प्रत्येकवेळी महिलेबाबत रेल्वे पोलिसांशी मनोरुग्ण विभागातील डॉक्टर संपर्कात होते़