शहरात दोन दुचाकी लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:12+5:302021-03-28T04:17:12+5:30
बोलण्यात गुंतवून मोबाइल लांबविला चौफाळा भागातील शिवमंदिरासमोर बोलण्यात गुंतवून एका तरुणाचा मोबाइल लांबविण्यात आला. ही घटना २६ मार्च रोजी ...
बोलण्यात गुंतवून मोबाइल लांबविला
चौफाळा भागातील शिवमंदिरासमोर बोलण्यात गुंतवून एका तरुणाचा मोबाइल लांबविण्यात आला. ही घटना २६ मार्च रोजी घडली. मारोती तानाजी रामदिनवार हे घरी असताना आरोपीने त्यांना बाहेर बोलाविले. या वेळी बोलण्यात गुंतवून रामदिनवार यांच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबविला. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रवासात महिलेचे दागिने केले लंपास
शहरातील देगलूर नाका ते मालेगाव रस्त्यावर ऑटोने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे पर्समधील ८२ हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना २४ मार्च रोजी घडली. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हारुन पिंजारी (रा. गिरगाव, ता. वसमत) ही महिला भावजयीसोबत देगलूर नाका येथील त्यांच्या बहिणीच्या घरी भेटण्यासाठी आली होती. भेटल्यानंतर ऑटोने त्या परत आपल्या गावी निघाल्या होत्या. ऑटोतून मालेगाव परिसरात उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की पर्समधील ८२ हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पो.ना. मंगनाळे हे करीत आहेत.
घराच्या वादातून जबर मारहाण
तालुक्यातील साेमेश्वर येथे घर नावाने करून देण्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना २४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. हाणमंत देविदास कौशे हे किराणा दुकानासमोर थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आले. या वेळी त्यांनी कौशे यांच्यासोबत वाद घालून मारहाण केली. या प्रकरणात लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विक्रीच्या ५० हजारांवरून वाद
घर विक्री केलेल्या रकमेतील राहिलेले पन्नास हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना २१ मार्च रोजी घडली. मौजे आळंदी येथील मारोती हुलप्पा संगनाळे हे आरोपीच्या भावाकडे पैशाची मागणी करण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपीने पैसे देण्यास नकार देत संगनाळे यांनाच मारहाण केली. या प्रकरणात रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात तपास पो.हे.कॉ. भवानगीकर हे करीत आहेत.