शहरातून दोन दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:26+5:302021-07-15T04:14:26+5:30
दहा हजार रुपयांचे साहित्य चोरीला किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात बसविण्यात आलेले वन परिक्षेत्रातील दहा हजार रुपयांचे सोलार प्लांट चोरट्यांनी ...
दहा हजार रुपयांचे साहित्य चोरीला
किनवट तालुक्यातील अंबाडी घाटात बसविण्यात आलेले वन परिक्षेत्रातील दहा हजार रुपयांचे सोलार प्लांट चोरट्यांनी लांबविले आहेत. ही घटना ४ जुलै रोजी घडली. या प्रकरणात परिक्षेत्र मंडळ अधिकारी अर्चना ए. पंदीलवाड यांच्या तक्रारीवरून मांडवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
जागेच्या वादासाठी विवाहितेचा छळ
हॉटेलच्या जागेचा वाद सोडविण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना नागपूर येथे घडली. या प्रकरणात सुनील भोसले, मीराबाई भोसले, निवृत्ती भोसले, सुनीता भाेसले, सुधीर भोसले, ज्याेती भोसले आणि गोविंद भाेसले यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पहिली असताना दुसरीशी घरोबा
पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नसल्याने त्रास देऊन घराबाहेर हाकलल्यानंतर दुसरीशी घरोबा करण्यात आला. ही घटना उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथे घडली. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महादेव शेषराव सूर्यवंशी यांच्या पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे नेहमी टोमणे मारण्यात येत होते. दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ८० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली; परंतु मागणी पूर्ण न झाल्याने महादेवने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. याची माहिती मिळाल्यानंतर पहिल्या पत्नीने महिला साहाय्य कक्षात धाव घेतली. त्यानंतर मरखेल पोलीस ठाण्यात महादेव सूर्यवंशी, शेषराव सूर्यवंशी, मंगलाबाई सूर्यवंशी, बंडू सूर्यवंशी, संगीता चोंडे, राजू पंढरी मामा आणि सविता सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी
कंधार आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकण्यात आल्या. पेठवडज येथे अमर चौकातून कल्याण नावाच्या मटका अड्ड्यावरून दोन हजार रुपये जप्त केले, तर तळणी शिवारात जुगाऱ्याच्या अड्ड्यावरून २ लाख ६० हजार रुपये जप्त केले.