जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:38+5:302021-08-14T04:22:38+5:30

कासराळीत वकिलाचा मोबाइल लंपास बिलोली तालुक्यातील कासराळी येथे वकिलाचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाइल घरातून लंपास करण्यात आला. ही ...

Two bikes were stolen in the district | जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

Next

कासराळीत वकिलाचा मोबाइल लंपास

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे वकिलाचा १२ हजार रुपये किमतीचा मोबाइल घरातून लंपास करण्यात आला. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. माधव किशन मेहतरे यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

रुग्णालयातील ऑक्सिजन मॅनी फोल्ड चोरीला

कंधार येथील शासकीय रुग्णालयात असलेली सेंट्रल ऑक्सिजन मॅनी फोल्ड अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. शवविच्छेदन कक्षाच्या बाजूला असलेली दीड लाख रुपये किमतीची मॅनी फोल्ड होती. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या तक्रारीवरून कंधार पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

भाजीपाल्याच्या धंद्यासाठी दोन लाखांची मागणी

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुनील गिरेवाड, गणपत गिरेवाड, सावित्रीबाई गिरेवाड, लक्ष्मी महेश रॅपनवाड, महेश रॅपनवाड, ग्रामसेवक नारायण एडके यांच्यावर मांडवी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

दिसायला चांगली नाही असे म्हणून घर बांधकामासाठी पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात राहुल निवृत्ती गजभारे, निवृत्ती गजभारे, गोदावरी गजभारे, आम्रपाली कांबळे, गौतम कांबळे, मायावती कांबळे, राजू कांबळे यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Two bikes were stolen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.