बारड-भोकर राष्ट्रीय महामार्गावर दोन कारचा समोरासमोर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:57+5:302020-12-11T04:44:57+5:30

तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगडे, आडसुळे, कोळशिकवार हे कर्मचारी तपासकामी चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.१२के.वाय.१२०७ मध्ये तपासकामी उस्मानाबाद ...

Two cars collided head-on on the Barad-Bhokar National Highway | बारड-भोकर राष्ट्रीय महामार्गावर दोन कारचा समोरासमोर अपघात

बारड-भोकर राष्ट्रीय महामार्गावर दोन कारचा समोरासमोर अपघात

googlenewsNext

तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगडे, आडसुळे, कोळशिकवार हे कर्मचारी तपासकामी चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.१२के.वाय.१२०७ मध्ये तपासकामी उस्मानाबाद येथे जात होते. बुधवारी सकाळी नऊच्या वेळेत पोलिसांच्या वाहनाला समोरुन येणारे (क्रमांक एम.एच.४६ बी.एम.३१३५) वाहनाने जबर धडक दिली. या अपघाती घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले असून एका चालकास दरवाजा कापून बाहेर काढण्यात आले आहे.

अपघात घटनेची माहिती मिळताच बारड महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महामार्गाचे पो.नि.अरुण केंद्रे (बारड), येथील प्रभारी अधिकारी विठ्ठल दुरपडे, कर्मचारी भागवत आयनिले, अफसर पठाण, बालाजी ठाकूर यांनी जखमींना रुग्णवाहिकाद्वारे बारड ग्रामीण रुग्णालयातून नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Web Title: Two cars collided head-on on the Barad-Bhokar National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.