दोन दिवसांत २२ कोरोनाबाधित, ४३ स्वॅबचे अहवाल बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:17 AM2021-02-12T04:17:27+5:302021-02-12T04:17:27+5:30
दोन दिवसांत ४३ शिक्षकांच्या घेतलेल्या आरटी-पीसीआर स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी असल्याने किनवटमध्ये कोरोना डोके वर काढू लागल्याचे चित्र आहे. ...
दोन दिवसांत ४३ शिक्षकांच्या घेतलेल्या आरटी-पीसीआर स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी असल्याने किनवटमध्ये कोरोना डोके वर काढू लागल्याचे चित्र आहे. गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ते ११ फेब्रुवारीपर्यंत २९५ कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात १९ जण पॉझिटिव्ह आले. त्यात शासकीय आश्रमशाळा किनवट व जलधारा येथील पाच कर्मचारी, किनवट येथील शासकीय आश्रमशाळेचे सहा विद्यार्थी, सहस्रकुंड, पाटोदा आश्रमशाळेचे प्रत्येकी एक असे आठ विद्यार्थी, कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे तर किनवट येथील एका कॉलनीतील एकाच कुटुंबातील चार जण कोरोनाबाधित आढळले. या दोन दिवसांत ४३ शिक्षकांचे स्वॅब घेतले असून आरटी-पीसीआर तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. आश्रमशाळा प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या उपाययोजना करून वर्ग सुरू असल्याचे शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी टेळे व मुख्याध्यापक नागनाथ कराड यांनी यावर सांगितले.