दोन दिवसांपूर्वी जिथे तलवार मिरवली; आज तिथेच सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली
By श्रीनिवास भोसले | Updated: December 10, 2024 18:57 IST2024-12-10T18:56:58+5:302024-12-10T18:57:10+5:30
नांदेड ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराची काढली धिंड

दोन दिवसांपूर्वी जिथे तलवार मिरवली; आज तिथेच सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली
नांदेड : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वर असलेले व वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी यांची मंगळवारी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढून फिरवले.सदरचे आरोपी हे वारंवार गुन्हे करणारे, मुख्य मार्केटमध्ये रस्त्याने गाड्या फिरवणारे हातात तलवारी घेऊन फिरणारे व सर्व सामान्यांना भीती वाटावी असे दहशत पसरविणारे आरोपी असून. यापूर्वी त्यांच्यावर हाफ मर्डर, मर्डर सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दोन दिवसांपूर्वी या आरोपीने मार्केटमध्ये तलवारी घेऊन मोटर सायकलने फिरवून दहशत पसरवली होती. त्यामूळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत तयार झाली होती. आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तर काही होत नाही अशा अविर्भावांमध्ये हे आरोपी फिरत होते. मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी यांना तात्काळ अटक करून यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले न्यायालयामध्ये सादर करून त्याचा पीसीआर घेतला आणि ज्या रस्त्याने हे आरोपी दहशत माजवत फिरत होते त्याच रस्त्याने सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी यांच्या हातामध्ये हातकड्या घालून दोर बांधून फिरवले. परिणामी सर्वसामान्य व्यक्ती महिला व्यापारी यांच्या काळातील दहशत कमी होऊन आरोपीच्या मनात दहशत बसली आहे. सर्वसामान्य जनतेतून पोलिसांच्या या कृतीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप २०१२ मध्ये जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एसपी होते. त्या काळात सिडकोतील एका कुख्यात गुंडाला अशाच पद्धतीने मार्केटमध्ये धिंड काढून फिरवले होते.