नांदेड शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:48 AM2018-11-17T00:48:10+5:302018-11-17T00:49:54+5:30

परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़

Two days water supply to Nanded city | नांदेड शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा

नांदेड शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय १८ नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी पाणीटंचाईची समस्या भीषण

नांदेड : शहराची भिस्त असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात गुरुवारी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळीही सोडण्यात आली आहे़ त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी घट झाली आहे़ परिस्थिती बिकट झाल्यामुळे महापालिकेने रविवारी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ नांदेडकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़
यंदा नांदेड जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प भरला होता़ प्रकल्पाचे दरवाजे उघडून अनेकवेळा पाणी गोदावरीत सोडण्यात आले होते़ परतीच्या पावसात दरवर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्या जाते़ परंतु यंदा परतीच्या पावसाने दगा दिला़
त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाच नाही़ त्यात गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात येत आहे़ गेल्या महिनाभरात विष्णूपुरी प्रकल्पातून तब्बल २३ दलघमी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे़ गोदावरी नदीवर आजघडीला प्रशासकीय आकडेवारीनुसार अडीच हजार वीजपंपाद्वारे पाणी उपसा करण्यात येत आहे़
त्यातील १ हजारावर विद्युत पंप हे अनधिकृत आहेत़ प्रकल्पातून प्रतिदिन ०़७५ दलघमी पाणीसाठा कमी होत आहे़
याच वेगाने उपसा सुरु राहिल्यास फेब्रुवारीपर्यंतच विष्णूपुरी कोरडाठाक पडण्याची भिती आहे़ प्रकल्पातून होणारा हा पाणीउपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली होती़ त्यात गुुरुवारी विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पाळी सोडण्यात आली़
३० नोव्हेंबरपर्र्यंंत हे पाणी सोडण्यात येणार आहे़ प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाळी सोडण्यात आली असली तरी, दुसरी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे़ त्यामुळे सद्यस्थितीला असलेले पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही़ या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त लहूराज माळी यांनी १८ नोव्हेंबरपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ येत्या काही दिवसात नांदेडकरांवर जलसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत़
पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त

  • शहरासाठी इसापूर प्रकल्पातील आधारीत सांगवी येथील बंधाºयावर पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे़ सांगवी बंधा-याची क्षमता तसेच पंपगृहाची क्षमता घेता उत्तर नांदेड भागातील जवळपास दोन लाख लोकांनाच या योजनेद्वारे पाणी मिळू शकते़ आता विष्णूपुरीतील पाण्याचा वेगाने उपसा होत असल्यामुळे पर्यायी पाणीपुरवठ्यावर भिस्त राहणार आहे़ परंतु पर्यायी पाणीपुरवठा योजनेलाही मर्यादा आहेत़ त्यामुळे नांदेडकरांची मोठी पंचाईत होणार असल्याचे दिसत आहे़
  • विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यात नांदेडला इतर ठिकाणाहून पाणी मिळण्याची शक्यताही धूसर आहे़ त्यामुळे नागरीकांनी उपलब्ध असलेले पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ पाण्याचा दुरुपयोग टाळून नळाला तोट्या बसवाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे़

Web Title: Two days water supply to Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.