नांदेडमध्ये आढळले डेल्टा प्लसचे दोन रुग्ण; नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाचं आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 11:55 PM2021-08-11T23:55:27+5:302021-08-11T23:55:36+5:30

नांदेडसह राज्यभरातील प्रत्येक जिल्हे हे घेतलेल्या स्वबपैकी काही नमुने हे पुण्याला पाठवत होते.

Two Delta Plus patients found in Nanded; Citizens should not be scared, administration appeals | नांदेडमध्ये आढळले डेल्टा प्लसचे दोन रुग्ण; नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाचं आवाहन

नांदेडमध्ये आढळले डेल्टा प्लसचे दोन रुग्ण; नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाचं आवाहन

googlenewsNext

नांदेड-  कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता नव्या विषाणूचा धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात डेल्टा प्लस चे दोन रुग्ण आढळले असून दोघेही ठणठणीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे. राज्यात कोरोना ची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा चा धोका समोर आला.

औरंगाबाद, बीड यासह राज्यात काही ठिकाणी हे रुग्ण आढळले. नांदेडसह राज्यभरातील प्रत्येक जिल्हे हे घेतलेल्या स्वबपैकी काही नमुने हे पुण्याला पाठवत होते. जुलै महिन्यातही नांदेड मधून 100 स्वब पाठविण्यात आले होते. त्यात लोहा तालुक्यातील 38 वर्षीय आणि हडको भागातील 18 वर्षीय तरुणाला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु उपचारा नंतर हे दोघेही बरे झाले आहेत. त्यामुळे काळजी करू नये असेही जिल्हाधिकारी इटनकर यांनी स्पस्ट केले.

Web Title: Two Delta Plus patients found in Nanded; Citizens should not be scared, administration appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड