गाडीला कट मारल्यावरून दोन गट भिडले; तोडफोड, दगडफेकीने गावकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 05:20 PM2022-07-01T17:20:38+5:302022-07-01T17:24:30+5:30

सध्या मालेगाव परिसरात तणावपूर्ण शांतता असून परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे.

Two groups clashed after the bike was cut; Vehicle vandalism, major damage by stone throwing | गाडीला कट मारल्यावरून दोन गट भिडले; तोडफोड, दगडफेकीने गावकऱ्यांचे मोठे नुकसान

गाडीला कट मारल्यावरून दोन गट भिडले; तोडफोड, दगडफेकीने गावकऱ्यांचे मोठे नुकसान

googlenewsNext

- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जि. नांदेड)
- किरकोळ कारणावरून युवकांत झालेल्या वादावादीनंतर अर्धापुर तालुक्यातील मालेगाव येथे मोठा राडा झाला. जमावाने दगडफेक करत वाहने, दुकानांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगविले असून परिसरात चोख बंदोबस्त आहे. सध्या मालेगाव परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली.

गुरूवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान गाडीला कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटांनी सामंजस्याने वाद मिटवल्याने प्रकरण निवळले होते. शुक्रवारी सकाळी दुधवाल्या एका जणासोबत पुन्हा हाणामारी झाली. यामुळे वाद चिघळला. अचानक दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत अनेक वाहने, दुकानांचे मोठे नुकसान झाले. यात रामचंद्र जोशी, भिमराव राठोड, संदिप आनेबोईनवाड, पप्पू चव्हाण आदी नागरिक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच परिसरात चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक एल.व्ही.राख, पोउनी बळीराम राठोड,तय्यब अब्बास,भिमराव राठोड,सापोनी तुगावे,पोउनी केसगे,बोईनवाड, संतोष सुर्यवंशी, महेंद्र डांगे, कल्याण पांडे आदींनी चौक बंदोबस्त ठेवला आहे.

तीन जण ताब्यात
या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येतील. परिसरात सध्या शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.
- विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक भोकर विभाग

Web Title: Two groups clashed after the bike was cut; Vehicle vandalism, major damage by stone throwing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.