दोघांचा मृत्यू, तर ४३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:40+5:302020-12-12T04:34:40+5:30

शुक्रवारी प्रशासनाला ८९१ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ...

Two killed, 43 injured | दोघांचा मृत्यू, तर ४३ बाधित

दोघांचा मृत्यू, तर ४३ बाधित

googlenewsNext

शुक्रवारी प्रशासनाला ८९१ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २५, भोकर १, कंधार १, नायगाव १, नांदेड ग्रामीण २, बिलोली १ आणि मुखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर ॲंटिजन तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र ५, हदगाव १, परभणी १, तेलंगणा १, कंधार १, भोकर १ आणि यवतमाळ येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कलामंदिर आणि सुमेधनगर नांदेड येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या गृह विलगीकरण आणि रुग्णालयात ३९१ जण उपचार घेत आहेत. त्यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय २५, जिल्हा रुग्णालय २४, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ३२, मुखेड १८, देगलूर १, भोकर २, हदगाव ६, किनवट १, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १५५, ग्रामीण भागातील गृह विलगीकरण ४२ आणि खाजगी रुग्णालयातील १५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १७० आणि जिल्हा रुग्णालया ६२ खाटा रिक्त आहेत.

चौकट- ४७ जणांची कोरोनावर मात

शुक्रवारी उपचार घेत असलेल्या ४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये एनआरआय व गृह विलगीकरण ७, हदगाव १३, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २, देगलूर १, जिल्हा रुग्णालय ६, मुखेड ३, कंधार ९ आणि खाजगी रुग्णालयातील ६ जणांचा समावेश आहे. उपचार घेत असलेल्या १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: Two killed, 43 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.