सगरोळीत घर फोडून दोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:18 AM2021-05-09T04:18:24+5:302021-05-09T04:18:24+5:30

दुसऱ्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मंदिरात चोरी करण्यात आली. खंडोबा, थोट्या हनुमान व मल्लिनाथ मंदिर येथील ...

Two lakh lamps were broken into a house in Sagaroli | सगरोळीत घर फोडून दोन लाख लंपास

सगरोळीत घर फोडून दोन लाख लंपास

Next

दुसऱ्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मंदिरात चोरी करण्यात आली. खंडोबा, थोट्या हनुमान व मल्लिनाथ मंदिर येथील चार पितळी घंट्या चोरट्यांनी लांबविल्या. या प्रकरणात गुरलिंग ढणमने यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र थांबेना झाले असून, आणखी तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विमानतळ हद्दीत शाहूनगर येथे बालाजी हसेवाड या हॉटेल व्यावसायिकाची (एमएच२६, एएम ३६१३) या क्रमांकाची ४० हजारांची दुचाकी लंपास करण्यात आली. देगलूर येथे अहमदीया कॉलनीतून अहमद रसूलमिया कुरेशी यांची (एमएच २६, एक्यू ६३३०) या क्रमांकाची दुचाकी चोरीस गेली; तर नांदेड ग्रामीण हद्दीत सुखमनी हॉस्टेल समोरून डॉ. शाम पाटील यांची (एमएच २५, एपी ५५४४) या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लांबविली. या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

वायफना बु. ते तामसा रस्त्यावर दुचाकीला महिंद्रा मॅक्सीमोने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. तुकाराम गणपत साबळे हे बहिणीसह दुचाकीवरून गावाकडे परत येत होते. हुतात्मा शाळेजवळ भरधाव वेगातील महिद्रा मॅक्सीमो या गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे बहिण-भाऊ जखमी झाले होते. उपचारादरम्यान तुकाराम साबळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तामसा पाेलिी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन ठिकाणी जुगार अड्डयांवर धाडी

जिल्ह्यात हिमायतनगर आणि धर्माबाद अशा दोन ठिकाणी जुगार अड्डयांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बसस्थानक परिसरात टाईम बाजार नावाचा मटका सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून दोन हजार रुपये जप्त् केले; तर धर्माबाद तालुक्यातील मौजे रत्नाळी येथे मिलन डे नावाचा जुगार सुरू होता. येथून १४ हजार १९० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन्ही ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Web Title: Two lakh lamps were broken into a house in Sagaroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.