Maharashtra Assembly Election 2019 : नांदेड उत्तर व दक्षिणमधून दोघांची उमेदवारी दाखल;जिल्ह्यात ४५९ अर्जांची विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:13 PM2019-09-28T18:13:57+5:302019-09-28T18:18:03+5:30

पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती़

two nomination filed for Nanded North and South; sale of 459 applications in the district | Maharashtra Assembly Election 2019 : नांदेड उत्तर व दक्षिणमधून दोघांची उमेदवारी दाखल;जिल्ह्यात ४५९ अर्जांची विक्री 

Maharashtra Assembly Election 2019 : नांदेड उत्तर व दक्षिणमधून दोघांची उमेदवारी दाखल;जिल्ह्यात ४५९ अर्जांची विक्री 

Next
ठळक मुद्देयाद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा

नांदेड : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली़ उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात फक्त नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन मतदारसंघातून दोघांनी उमेदवारी दाखल केली़ नऊही मतदारसंघात पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती़पहिल्या दिवशी एकूण ४५९ अर्ज विक्री करण्यात आले़ आता पितृपक्ष संपल्यानंतरच उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे़

जिल्ह्यात नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव, लोहा, मुखेड, देगलूर, किनवट व हदगाव असे नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत़ शुक्रवार, २७ सप्टेंबरपासून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली़ ४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे़ दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी ही ५ आॅक्टोबरला होणार आहे़ शुक्रवारी नांदेड उत्तर मतदारसंघातून १२३ तर दक्षिण मतदारसंघातून ९८ अर्ज खरेदी केले़ तर नांदेड उत्तर व दक्षिणमधून प्रत्येक एकाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ इतर सातही मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक गेला़ 

किनवटमध्ये पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी ३६ अर्ज घेऊन गेले आहेत, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली़ नामनिर्देशनपत्राची छाननी शनिवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथील सभागृहात करण्यात येईल. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उमेदवारास येताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरील परिसरात  तीन वाहनांचा वापर करता येईल व त्यांच्या कक्षात सोबत पाच व्यक्तींनाच आणता येईल. मोबाईलचा वापर करता येणार नाही. यावेळी कोणत्याही घोषणा देता येणार नाहीत, वाद्य वाजविता येणार नाही. असेही गोयल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी सांगितले़ 

मुखेड-कंधार मतदारसंघासाठी १३ उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती   निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली़ त्यात संजय बापूराव इंगोले (मुखेड), बालाजी जनार्धन आगलावे (सांगवी भादेव), संभाजी गंगाराम लव्हाळे (उंद्री प.मु.), बंडाप्पा माधवराव किसवे (सावळी), पंजाबराव श्रीहरी वडजे (मसलगा ताक़ंधार), प्रमोद कोंडिबा मुदाळे (अवलकोंडा ता.उदगीर), संदीप गौतम काळे (मुखेड), प्रमोद कोंडिबा मोदाळे (अवलकोंडा ता़उदगीर), नागोराव  हुलप्पा श्रीरामे (कमळेवाडी), संभाजी दत्तात्रय मुकनर (उंद्री प.मु.), राघवेंद्र नारायणराव जोशी (बाºहाळी), प्रकाश बळीराम बनसोडे (मुखेड), सचिन विठ्ठलराव गायकवाड (मुखेड) या १३ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. मात्र एकही अर्ज भरुन दाखल झाले नाही.

देगलूर मतदारसंघात १२ उमेदवारांनी १५ अर्ज खरेदी केले आहेत़ मात्र एकानेही पहिल्या दिवशी उमेदवारी दाखल केली नाही़ नायगाव मतदारसंघात २३ उमेदवारांनी ४० अर्ज खरेदी केले आहेत़ या मतदार संघातही उमेदवारी दाखल निरंक राहिली़ हदगावमध्ये २० तर लोहा मतदारसंघात १४ अर्ज विक्री करण्यात आले़ जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण ४५९ अर्ज विक्री झाले.

भोकरमध्ये १०६ इच्छुकांनी घेतले २५० अर्ज
भोकर विधानसभा मतदारसंघातूनअर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी १०६ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी दिली. पहिल्याच दिवशी उपविभागीय कार्यालयात नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच गर्दी केली. यात नामनिर्देशनपत्र देण्याच्या वेळेपर्यंत १०६ जणांनी २५० अर्ज घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना सुरु झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात १०० मीटरच्या आत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येवून संभाव्य गर्दी लक्षात घेवून बॅरिकेट लावण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची शेवटची तारीख ४ आॅक्टोबर असलीतरी शनिवार व त्यानंतर रविवारची सुटी असल्याने सोमवारी घटस्थापनेच्या दिवशीपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटस्थापनेचा मुहुर्त
कोणत्याच पक्षाने आपले पत्ते अद्याप उघड केले नसून दोन दिवसांवर आलेल्या घटनास्थापनेच्या मुहूर्तावर उमेदवारी दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे़ 

Web Title: two nomination filed for Nanded North and South; sale of 459 applications in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.