हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी सुपर फास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:05+5:302021-03-24T04:16:05+5:30

नांदेड, हजरत निझामुद्दीन-हुजूर साहिब नांदेड -हजरत निझामुद्दीन दरम्यान होळी उत्सव सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय उत्तर रेल्वेने घेतला ...

Two rounds of Holi Super Fast special train between Hazrat Nizamuddin-Nanded | हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी सुपर फास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

हजरत निझामुद्दीन-नांदेड दरम्यान होळी सुपर फास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

Next

नांदेड, हजरत निझामुद्दीन-हुजूर साहिब नांदेड -हजरत निझामुद्दीन दरम्यान होळी उत्सव सुपर फास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय उत्तर रेल्वेने घेतला आहे. या गाड्या नांदेड विभागातून धावणार आहेत.

गाडी संख्या ०४०३८ ही विशेष गाडी हजरत निझामुद्दीन येथून २५ मार्च आणि १ एप्रिल रोजी गुरुवारी रात्री ११.१५ वाजता सुटेल आणि भोपाळ, अकोला मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.४० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०४०३९ ही विशेष गाडी हुजूर साहिब नांदेड येथून २७ मार्च आणि ३ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि अकोला, भोपाळ मार्गे हजरत निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता पोहोचेल.

या गाड्यांना मिळाली मुदतवाढ

बंगलोर-नांदेड-बंगलोर उत्सव विशेष गाडी आणि ओखा-रामेश्वर-ओखा उत्सव विशेष गाड्या प्रवाशांच्या सेवेत सुरू आहेत. या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी संख्या ०६५१९ बंगलोर ते हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष गाडीस ३० मार्च ते ३० जूनपर्यंत, तर गाडी संख्या ०६५२० हुजूर साहिब नांदेड ते बंगलोर उत्सव विशेष गाडीस १ एप्रिल ते १ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गाडी संख्या ०६७३३ रामेश्वर-ओखा साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला २ एप्रिल ते २५ जून – १३ फेऱ्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच गाडी संख्या ०६७३४ ओखा - रामेश्वर साप्ताहिक उत्सव विशेष एक्स्प्रेसला ६ एप्रिल ते २९ जून दरम्यान १३ फेऱ्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Two rounds of Holi Super Fast special train between Hazrat Nizamuddin-Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.