हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:04 AM2018-12-04T01:04:19+5:302018-12-04T01:06:04+5:30

मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.

Two students suicides in Hadgaon taluka | हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

हदगाव तालुक्यात दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

googlenewsNext

हदगाव : मनाठा येथील ९ वीत व सावरगाव येथील ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने किरकोळ कारणावरुन आत्महत्या केल्याच्या दोन घटना तीन दिवसांत घडल्या. दैनंदिन जीवनात मुले चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे कसे? असा प्रश्न यानिमित्ताने पालकांना पडला आहे.
मनाठा येथील यश सुनील चौरे हा ९ वीत होता. सेमीवर्गाला असल्याने त्याच्या पालकाने त्याला नांदेड येथे शिकवणी लावून खाजगी वसतिगृहात ठेवले होते. सहा महिने तो नांदेडला व्यवस्थित राहिला. दिवाळीच्या सुटीत तो गावी मनाठा येथे आला होता. सुट्या संपल्याने सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी तो नांदेड येथे वसतिगृहात गेला, मंगळवारी रात्री लगेच तो गावी आला. वसतिगृहातील अन्य मुले आली नाहीत, असे त्याने घरी सांगितले. गुरुवार, २८ रोजी सकाळी त्याचा मोठा भाऊ रजत नांदेडला कॉलेजला जात होता. रजतसोबत यशनेही जावे, असे पालकांचे म्हणणे होते.
मात्र तो गेला नाही. पालकांनी त्याला जाब विचारला, याचाच राग मनात ठेवून यशने सकाळी ८.३० च्या दरम्यान स्कार्फने गळफास लावला.
दुसरी घटना सावरगाव येथे घडली. अभिषेक बबन ठाकूर (वय १७) असे मयताचे नाव आहे. तो अकरावीला होता. हदगावला तो शिकायला होता. नवीन पद्धतीने (कोंबडा पद्धत) कटींग केल्याने त्याचे वडील त्याच्यावर रागावले व गावातील केशकर्तनालयात नेवून त्याची साधी कटींग केली. याचाच राग मनात ठेवून अभिषेकने ३० रोजी आईवडील शेतात गेल्याची संधी साधून राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी हदगाव तालुकावासिय हादरले. पहिल्या घटनेत मुलाच्या मनाप्रमाणे त्याला वसतिगृहात न पाठविता गावातच राहू दिले असते तर, दुसºया घटनेत पालकांनी मुलाच्या कटिंगकडे दुर्लक्ष केले असते तर दोन्ही घटना टळल्या असत्या, अशी चर्चा सुरु झाली.
खेड्यातील शाळेची गुणवत्ता टिकून राहिली तर पालक त्यांच्या पाल्यांना शहराकडे पाठविणार नाहीत. गुणवत्तावाढीची जबाबदारी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचीही नाही का ? शाळेतील शिक्षणाच्या धड्याशिवाय जीवन जगण्याचे धडे देण्याचे गुरुजी विसरले काय? कथा, कहाण्या सांगून मोठे होण्याचे स्वप्न गुरुजी विद्यार्थ्यांना पाहावयास लावत असत, ती कला सध्याचे शिक्षक विसरलेत काय? असा सवाल आहे.
एकूणच पालकांनी आता या दोन्ही घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे. आत्महत्या करणारा तर निघून जातो, मात्र पालकांना तो मरेपर्यंत यातना देतो, त्यामुळे पालकांनी आता मुलांसोबत प्रेमानेच बोलले पाहिजे, असे शिकावे, अशीही चर्चा सुरु आहे.
मुलांना रागावण्याचाही अधिकार पालकांना नाही?
या दोन्ही घटनांनी मात्र पालकवर्ग कमालीचा धास्तावला आहे. मुलांसोबत राहावे कसे ? तो चुकत असेल तर त्याला बोलूही नाही का? असे नानाविध प्रश्न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पोटाला चिमटा देवून ते यासाठी वाट्टेल ते करतात. स्वत:च्या गरजा कमी करुन पाल्यांना सुविधा देतात. आपल्या काळात न मिळालेल्या सुविधा, मुलांना तरी मिळाव्यात, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. असे वाटणे चुकीचे आहे का? आजचे पालकही २० ते २५ वर्षांपूर्वी विद्यार्थी होते. त्यांनीही अडचणीवर मात केली. या अडचणी मुलांना येवू नयेत, म्हणून त्यांना शहरात ठेवले जाते.गर्भ वाढवण्यासोबत तो मोठा होईपर्यंत मुलाची आई किती काळजी घेते, तिला रागावण्याचाही अधिकार मुलांनी देवू नये का ? असा सवाल पालकांचा आहे.

Web Title: Two students suicides in Hadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.