जिल्ह्यात दोन दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:15 AM2020-12-08T04:15:24+5:302020-12-08T04:15:24+5:30
शेख रहिम शेख मोतीजी रा.इम्रान कॉलनी यांनी ११ऑक्टोबर राेजी आपली एम.एच.२६, एएच८१५८ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ...
शेख रहिम शेख मोतीजी रा.इम्रान कॉलनी यांनी ११ऑक्टोबर राेजी आपली एम.एच.२६, एएच८१५८ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. चोरट्याने ३० हजार रुपयांची दुचाकी लंपास केली. तर लोहा तालुक्यातील सावरगाव येथे मुजीद महेमुद शेख यांनी युनिकॉर्न कंपनीची एम.एच.२६, एव्ही८३६७ या क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना ३ डिसेंबर रोजी घडली.
वाळू माफियांनी ट्रॉली सोडून काढला पळ
नांदेड- माहूर तालुक्यात लांजी शिवारात पैनगंगा नदीपात्रात अवैधपणे सुरु असलेल्या वाळू उपश्यावर कारवाईसाठी गेलेले पथक दिसताच वाळू माफियांनी ट्रॅक्टरची ट्रॉली त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. ही घटना ५ डिसेंबर रोजी घडली.
लांजी रेती घाटावरुन अवैधपणे वाळू उपसा सुरु असल्याची माहिती तहसीलच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर मंडल अधिकारी गोरखनाथ पदकोंडे यांनी पथकासह त्या ठिकाणी धाड मारली. यावेळी वाळू माफियांना पथक दिसताच त्यांनी पळ काढला. यावेळी या ठिकाणी विना क्रमांकाची ट्रॅक्टरची ट्रॉली आढळून आली.या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.