किनवट येथे घरासमोरुन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:32+5:302021-04-26T04:15:32+5:30

शेतकऱ्याचे ५० हजार रुपये लांबवले शहरातील नवीन मोंढा भागात खरेदीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या खिशातील ५० हजार रुपये चोरट्याने लंपास ...

Two-wheeler lamp in front of the house at Kinwat | किनवट येथे घरासमोरुन दुचाकी लंपास

किनवट येथे घरासमोरुन दुचाकी लंपास

Next

शेतकऱ्याचे ५० हजार रुपये लांबवले

शहरातील नवीन मोंढा भागात खरेदीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या खिशातील ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. किशोर रावसाहेब राजगोरे (रा. सेलगाव, ता. अर्धापूर) हे २४ एप्रिल रोजी नांदेडात खरेदीसाठी आले होते. यावेळी रिक्षातून जात असताना उज्ज्वल गॅस एजन्सीजवळ त्यांच्या खिशातील ५० हजार रुपये सहप्रवासी असलेल्या चोरट्याने काढून घेतले. थोड्याच वेळात ही बाब त्यांच्या लक्षात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल घुगे करत आहेत.

शेतात वखर घातला म्हणून मारहाण

उमरी तालुक्यातील शेलगाव शिवारात शेतात वखर घालून पाळी का हाणतोस, असे म्हणत शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. गंगाधर गोपाळ कदम हे शेतात असताना आरोपी याठिकाणी आला. यावेळी त्याने कदम यांच्याशी वाद घालून बैल बांधण्याच्या मेकने डोक्यावर मारहाण केली. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतातील झुडपे तोडण्यावरुन वाद

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे शेतातील झुडपे तोडण्यावरुन झालेल्या वादानंतर शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. शिवाजी माधवराव विभुते हे शेतात असताना आरोपी त्याठिकाणी आला व त्याने विभुते यांच्याशी वाद घालून कत्तीने मारहाण केली. याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैशाच्या वादातून घरात घुसून मारहाण

पैसे देत नसल्याच्या रागातून घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना नांदेड शहरातील चैतन्यनगर भागात घडली. सय्यद नजीर अहमद सय्यद निसार अहमद हे घरी असताना आरोपी त्याठिकाणी आले व त्यांनी आम्हाला खर्चासाठी पैसे का देत नाही, असे म्हणून वाद घालत सय्यद नजीर यांना मारहाण केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler lamp in front of the house at Kinwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.