माळेगावातून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:02+5:302021-01-16T04:21:02+5:30
हिंदी दिवस साजरा मुदखेड : येथील राजीव गांधी महाविद्यालयात झूम ॲपद्वारे विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डॉ. ...
हिंदी दिवस साजरा
मुदखेड : येथील राजीव गांधी महाविद्यालयात झूम ॲपद्वारे विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डॉ. सुजीतसिंह परिहार यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश कदम होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा. डॉ. लक्ष्मण काळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. साईनाथ शाहू यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
चिमुकल्यांना कपडेवाटप
मुदखेड : नांदेड येथील सपोनि महादेव मांजरमकर यांच्या वतीने मुदखेड येथील बाल अनाथ आश्रमातील चिमुकल्यांना कपडे वाटप करण्यात आले. या वेळी युवक काँग्रेसचे हृषीकेश पारवेकर, कानोबा बिस्मील्ले, इलियास पठाण, आनंदा गुठ्ठे, माधव मांजरमकर आदी उपस्थित होते.
सोनकांबळे यांची नियुक्ती
लोहा : लोहा तालुका विधि सेवा प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी मंगल सोनकांबळे यांची नियुक्ती झाली. याशिवाय श्याम पवार, ज्ञानोबा पवार, राजू तिडके यांचीही नियुक्ती झाली. या सर्वांचे स्वागत होत आहे. जि.प.हा. लोह्याच्या मुख्याध्यापिका मंजुषा जाधव यांनी सर्वांचा सत्कार केला. या वेळी फारुख शेख, अनंतवार, ताटे, हणमंत पवार आदी उपस्थित होते.
सगरोळी येथे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेची निवड चाचणी
नांदेड : जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना व राज्य ॲथलेटिक्स संघटना पुण्याच्या मान्यतेने रविवार १७ जानेवारी रोजी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथे १४, १६, १८, २० वर्षांच्या आतील वयोगटातील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे.
तसेच राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली. खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना दोन फोटो, मूळ आधार कार्ड, मूळ जन्मदाखला (पालिका किंवा ग्रामपंचायत), प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी १०० रुपये शुल्क, १२५ रुपये नावनोंदणी शुल्क घेऊन उपस्थित राहावे. नोंदणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. या चाचणीत किमान पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. २० वर्ष आतील राज्यस्तरीय स्पर्धा २० जानेवारी रोजी होणार आहे.
जिल्ह्यातील १००, २००, ४००, १५००, ३०००, ५०००, १०,००० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, रिले प्रकारामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी चाचणीसाठी उपस्थित राहावे. खेळाडू व पालक यांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख, उपाध्यक्ष डॉ. अर्जुन मापारे, डॉ. डी.बी. जोशी, डॉ. उमेश भालेराव, नारायण सूर्यवंशी, ॲड. अमरीकसिंघ वासरीकर आदींनी केले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिव प्रलोभ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.