जिल्हा कचेरीतून दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:19 AM2021-09-11T04:19:56+5:302021-09-11T04:19:56+5:30

मूलबाळ होत नसल्याचे विवाहितेचा छळ हदगाव तालुक्यातील नेवरी येथे मूलबाळ होत नाही म्हणून टोमणे मारत हुंड्यातील ५० हजार रुपये ...

The two-wheeler was removed from the district office | जिल्हा कचेरीतून दुचाकी लांबविली

जिल्हा कचेरीतून दुचाकी लांबविली

Next

मूलबाळ होत नसल्याचे विवाहितेचा छळ

हदगाव तालुक्यातील नेवरी येथे मूलबाळ होत नाही म्हणून टोमणे मारत हुंड्यातील ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला त्रास देण्यात आला. तसेच सासरी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात देवराव कोंडिबा हापसे, अन्नपूर्णा कोंडिबा हापसे, पुंडलिक हापसे यांच्या विरोधात मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

कोचिंगला गेला अन् बेपत्ता झाला

शहरातील दिलीपसिंग कॉलनी भागातील एका १७ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. सतसिंदर जितपालसिंग सेन असे मुलाचे नाव आहे. ८ सप्टेंबर रोजी तो कोचिंग क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडला होता. तो परत आलाच नाही. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चार ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी

जिल्ह्यात मुक्रमाबाद, तामसा, मांडवी आणि इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाडी मारल्या. गोजेगाव येथे ६ हजार ४०० रुपये, तामसा १ हजार ६००, नवरगाव १ हजार ३१० आणि इस्लापूर येथे १ हजार २४० रुपये जप्त करण्यात आले.

Web Title: The two-wheeler was removed from the district office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.