शेताचा बळजबरीने ताबा घेणाऱ्या आठ जणांना सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:28 PM2020-01-13T20:28:14+5:302020-01-13T20:29:28+5:30
लहान भावाच्या जमिनीचा घेतला होता ताबा
नांदेड : लोहा तालुक्यातील पिंपळगांव ढगे येथे भावाच्या हिस्स्याच्या शेतीचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या मोठ्या भावासह इतर आठ जणांना न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे़
मारोती टोकलवाड यांनी मुलगा गजानन टोकलवाड यांच्या वाट्यातील जमीन गट क्रमांक १८३ मधील हेक्टर ३७ आर भूखंड दिला होता़ परंतु हा भूखंड त्यांचा दुसरा मुलगा ज्ञानेश्वर टोकलवाड यांनी जबरीने ताबा घेतला़ तसेच या शेतात वाटेकरी लावून मशागत सुरु केली़ त्यामुळे वाद निर्माण झाला होता़ २६ मार्च २०१६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर मारोती टोकलवाड यांनी लोहा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यावरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ लोहा पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ न्यायालयाने या प्रकरणात सहा साक्षीदार तपासले़
त्यानंतर न्या़डी़आऱआरगडे यांनी आठ जणांना दोषी ठरवित दोन वर्ष सक्तमजूरी आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला़ ज्ञानेश्वर मारोती टोकलवाड, दौलत ज्ञानेश्वर टोकलवाड, गंगासागर टोकलवाड, नारायण संभाजी पंदलवाड, माधव नारायण पंदलवाड, संभाजी नारायण पंदलवाड, हिरासिंग कारजसिंग सिंधू, जागिरसिंग रुपसिंग खिपल यांचा शिक्षा झालेल्यात समावेश आहे़ पैरवी अधिकारी म्हणून अशोक पल्लेवाड यांनी बाजू मांडली़