विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:09 AM2019-04-27T01:09:09+5:302019-04-27T01:09:40+5:30

घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

Two years imprisment in the molestation case | विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

विनयभंग प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

Next

भोकर : घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
यातील आरोपी त्र्यंबक ऊर्फ गजानन घन:श्याम गोरापुडे (रा. धानोरा ता. भोकर) याने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केला होता. याबाबत प्राप्त तक्रारीवरून, भोकर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. सदर प्रकरणात तत्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक वाळके यांनी तपास करुन न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात तपासण्यात आलेल्या ५ साक्षीदारांची साक्ष व सबळ पुराव्याआधारे यातील आरोपी त्र्यंबक ऊर्फ गजानन घन:श्याम गोरापुडे यास २ हजार रुपये दंड व २ वर्षांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.
जबरी चोरी प्रकरणात तीन वर्षांची कैद
दिवसभर दुकानातील व्यवसाय करुन घरी परतणाऱ्या दुकान मालकाजवळील पैशाची बॅग हिसकावून पळणाºया आरोपीस ३ वर्षांची शिक्षा येथील तर्द्थ जिल्हा व सत्र न्या. एन. पी. त्रिभूवन यांनी शुक्रवारी सुनावली.
शहरातील प्रिन्स जर्दा स्टोअर्सचे मालक हाजी अब्दुल शुकर हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन व्यवसायाची रक्कम एका बॅगमध्ये घेवून जाताना ३ चोरट्यांनी रस्त्यात अडवून जबरीने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून पळून जात होते. दरम्यान, प्रसंगावधान राखून हाजी शकूर यांनी त्यातील एका चोरट्यास पकडले. यावेळी शकूर आणि चोरट्यामध्ये झटापटही झाली होती़
याबाबत भोकर पोलिसांत गुन्हा नोंद करून तत्कालीन पो.नि. पेरके यांनी तपास करुन आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात येवून आरोपी लक्ष्मण प्रताप पवार (रा. चिकाळातांडा (मोठा) ता. मुदखेड ) यास ४ हजार रुपये दंड व ३ वर्षांची शिक्षा सुनावली.

Web Title: Two years imprisment in the molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.