अवकाळीमुळे तापमानाचा यु टर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:28 AM2018-03-17T00:28:51+5:302018-03-17T00:29:23+5:30
गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे यंदा उन्हाळा अधिक तापदायी ठरण्याचे आडाखे बांधणाºया नागरिकांची निसर्गाने फिरकी घेतली़ गेल्या दोन दिवसांत नांदेडसह ग्रामीण भागात सूर्यदर्शन झाले नसून शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ नांदेड शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती़ त्यामुळे तापमान कमालीचे घसरले असून गारठाही वाढला होता़
मार्चच्या पहिल्या आठवड्यात नांदेडचे तापमान ३८ अंशावर गेले होते़ त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्याचा अनुभव येत होता़ दुपारच्या वेळी रस्त्यावरही शुकशुकाट राहत होता़ कुलरच्या विक्रीतही वाढ झाली होती़ परंतु अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ गुरुवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही़ त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या वेळी शहरात शिडकावा झाला़
दुपारनंतर मात्र पावसाची सारखी रिपरिप सुरु होती़ रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता़ त्यामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली़ तापमानाचा पाराही २४ अशांपर्यंत घसरला होता़ त्यामुळे नांदेडकरांना हुडहुडी भरत होती़
शुक्रवार बाजारात उडाली तारांबळ
गोकुळनगर भागात भरणाºया शुक्रवारच्या बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेते आणि नागरिकाची तारांबळ उडाली़ यावेळी विक्रेत्यांनी मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला़ त्यानंतर काही वेळ बाजारात ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती़ त्यानंतर अधूनमधून सारखी हजेरी लावलेल्या पावसामुळे अनेक जण बाजाराकडे फिरकलेच नाहीत़ त्यामुळे दिवसभर भाजीपाला घेवून बसलेल्या विक्रेत्यांची मोठी निराशा झाली़
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाची हजेरी
मांडवी : गत दोन दिवसांपासून मांडवी भागात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी अधूनमधून चालू असलेल्या रिमझिम पावसाने वातावरणात गारवा वाढलाक़ाढणीस आलेला हरभरा, गहू, ज्वारी इ़ रबी पिकांवर हवामानाचा परिणाम झाला आहे़ गत दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़
बिलोली : गत दोन दिवसांपासून बिलोली व परिसरात सूर्यदर्शन झाले नाही़ शुक्रवारी दुपारी ३ नंतर रिमझिम पाऊस सुरु झाला़ वातावरणातील बदलाने आजारही वाढले आहेत. शेतीची कामे विस्कळीत झाली असून बाजारपेठेतही सामसूम होती़ शुक्रवारी सायंकाळी सर्वदूर पाऊस झाला़
कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरात आज दुसºया दिवशीही अवकाळी पाऊस होवून काही भागात गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंटूर, सालेगाव राहेर, बेळगाव कोकलेगाव, शेळगाव, सांगवी, धनंज, सातेगाव, तालुक्यात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे .
गडगा : गडगा व परिसरात शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप चालू आहे. यातच गडग्यासह पाच गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता़ अवकाळीमुळे परिसरातील फळबागांसह पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे़
जीव टांगणीला़़़
भोकर: मागील दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होवून सततच्या ढगाळ वातावरणासह शुक्रवारी दुपारनंतर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुपारी ३ वाजेनंतर रिमझिम पावसास सुरुवात झाली. साधारणत: एक तास पडून उघडलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा हजेरी लावली. हरभरा पिकाची काढणी झाली असली तरी गहू २२५० हेक्टर, ज्वारी ५५२ हे. मका २२६ हेक्टर क्षेत्रावर असलेले पीक ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.
पिकांचे नुकसान
बोंडअळी व त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस,गारपिटीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ त्याची अद्याप भरपाईही करण्यात आली नाही़ तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट दारात येवून उभे राहिले आहे़ गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारीसह हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़