राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षांना अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:11+5:302021-09-25T04:18:11+5:30
चाैकट... वर्षभरापासून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली नाही. त्यातच तालुक्याबाहेरील कार्यकर्त्यांनी वेगळ्याच तालुक्याचा अध्यक्ष केल्याचेही एका कार्यकर्त्याने बैठकीत सांगितले. ...
चाैकट...
वर्षभरापासून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली नाही. त्यातच तालुक्याबाहेरील कार्यकर्त्यांनी वेगळ्याच तालुक्याचा अध्यक्ष केल्याचेही एका कार्यकर्त्याने बैठकीत सांगितले. या सर्व तक्रारी ऐकून झाल्यावर जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना पुढील काही दिवसात कार्यकारिणी जाहीर करण्याबरोबरच जिल्ह्यातील कार्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना कार्याध्यक्ष चव्हाण यांनी केल्या.
कार्याध्यक्षांनी टोचले कान
माणूस म्हणलं की गटबाजी असते, त्यामुळे पक्षात एकमेकांबद्दल मतभेद असू शकतात; परंतु कोणामध्येही मनभेद नाहीत. पदाधिकाऱ्यांच्या सूचना, तक्रारी आढावा बैठकीत ऐकून घेतल्या आहेत. तसेच ज्यांचे कान टाेचण्याची गरज आहे, त्यांचे कान टोचले, अशी प्रतिक्रिया प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षात नेहमीच सक्रिय असणारे दासराव पुयड, दत्ता पाटील, ॲड.सचिन जाधव, चंद्रकांत टेकाळे, धनंजय सूर्यवंशी, बंटी झोमडे आदी इच्छूक होते; परंतु वर्षभरापूर्वी जिल्हाध्यक्षपदी धोंडगे यांची वर्णी लावली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम झाले. त्यातील एकाही कार्यक्रमास दिलीप धोंडगे यांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्येच विसंवाद असल्याचे तेव्हा बोलले जावू लागले होते.