अनधिकृत टॉवरची उभारणी थांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:28+5:302020-12-23T04:15:28+5:30
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध कंपन्यांच्या टॉवरकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्याचवेळी अनधिकृत ...
शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध कंपन्यांच्या टॉवरकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्याचवेळी अनधिकृत टॉवरचीही मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे. मंगळवारी इस्लामपुरा भागात टॉवरची उभारणी सुरू असताना क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग व त्यांच्या पथकाने टॉवर उभारण्याचे काम थांबविले. कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या या टॉवरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरातील टॉवरधारकांकडे असलेल्या मालमत्ता कराची वसुली व अनधिकृत मोबाईल टॉवरचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरात अनेक नामांकित कंपन्यांनी अनधिकृतपणे टॉवर उभारले आहेत. याचा मोठा फटका मनपाच्या कर वसुलीला बसला आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता ही कर वसुली कठोरपणे केली जाईल, असे मनपा उपायुक्त डॉ. बाबूराव बिक्कड यांनी सांगितले.