वाडेकर हॉस्पिटल टेस्ट ट्युब बेबी सेंटरमध्ये आगळावेगळा महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 AM2021-03-20T04:17:00+5:302021-03-20T04:17:00+5:30
नांदेड : येथील वाडेकर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेने गर्भवती राहिलेल्या महिलांनी स्त्रीजन्माचा आदर ...
नांदेड : येथील वाडेकर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेने गर्भवती राहिलेल्या महिलांनी स्त्रीजन्माचा आदर करण्याची शपथ घेतली. फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी तब्बल अर्धशतक जिवंत टेस्ट ट्यूब बेबीचे गर्भ तयार करण्यात वाडेकर टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला यश आले आहे.
विविध ठिकाणी झालेल्या सोनोग्राफीत तब्बल ५० जिवंत गर्भांचे निदान झाले. डॉ. गायत्री वाडेकर यांनी या सर्व गर्भवती महिलांना स्त्रीजन्माचा आदर करणे, गर्भलिंग निदान न करणे याची शपथ घेण्यास सांगितले. तसेच अजून एका गर्भवती स्त्रीस, स्त्रीचे सामर्थ्य पटवून देऊन सहकार्य करण्यास सांगितले. आज समाजामध्ये वंध्यत्वाची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. गरीब, श्रीमंत, वय, राहणीमान या सर्व घटकांना या समस्याने ग्रासले आहे. कमी झालेले तर कधी अतिजास्त असलेले संप्रेरक एएमएच ही तर सर्व वयोगटातील स्त्रियांची फारच मोठी समस्या बनली आहे. कमी होत असलेले एएमएच व त्यामुळे कमकुवत झालेली प्रजनन क्षमता हा फार मोठा चिंतेचा विषय असल्याचे डॉ. वाडेकर म्हणाल्या. विविध जागतिक दर्जाची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने वंध्यत्वामुळे आलेले नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केला. ना नफा ना तोटा तत्त्वावर आधारित जागतिक दर्जाची यंत्रसामुग्री, विदेशात जाऊन घेतलेले प्रशिक्षण व जागतिक दर्जाचे रिझल्ट देऊन शेकडो कुटुंबांना मातृत्वाचे सुख दिले.
(वाणिज्य वार्ता)