नांदेडात अवकाळीने नुकसान, १.०९ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:21+5:302021-03-24T04:16:21+5:30

नांदेडसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शेतक-यांनी शेती कामाला वेग दिला आहे. परंतु, ...

Untimely damage recorded in Nanded, 1.09 mm rainfall recorded | नांदेडात अवकाळीने नुकसान, १.०९ मिमी पावसाची नोंद

नांदेडात अवकाळीने नुकसान, १.०९ मिमी पावसाची नोंद

Next

नांदेडसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शेतक-यांनी शेती कामाला वेग दिला आहे. परंतु, अनेकांची गहू कापणी सुरू आहे. त्यातच विजांचा कडकडाट आणि जोराचा वारा असल्याने केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. टरबूज, खरबूज पिकांनादेखील फटका बसला आहे.

जिल्ह्यात एकूण सरासरी १.०९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नांदेड तालुका - ४.६ मि.मि., बिलोली- ०१. मिमी., मुखेड- १.४ मिमी., कंधार - ०.७ मिमी., लोहा-३.०६ मिमी., हदगाव- २.१ मिमी., देगलूर - ०.२ मिमी., किनवट - १.०० मिमी., मुदखेड- १.०० मिमी., हिमायतनगर -०.१ मिमी., माहूर - ७.०० मिमी., धर्माबाद - ०० मिमी., अर्धापूर- ७.०८ मिमी. नायगाव तालुक्यात ०.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Untimely damage recorded in Nanded, 1.09 mm rainfall recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.