उर्दूघर हे भाषा चळवळीचे केंद्र ठरावे-चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:27+5:302021-07-15T04:14:27+5:30
पालकमंत्री चव्हाण यांनी उर्दूघराचे उद्घाटन आता झाले, त्यानंतर आता नांदेडमधील इदगाह परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात असल्याचे सांगितले. ...
पालकमंत्री चव्हाण यांनी उर्दूघराचे उद्घाटन आता झाले, त्यानंतर आता नांदेडमधील इदगाह परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात असल्याचे सांगितले. अल्पसंख्याक विभागाकडे अल्पसंख्याकाच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. अल्पसंख्याक विभागाचे बजेट आता १ हजार कोटी रुपये करावे, अशी मागणी आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्याची आठवण करुन देताना त्या नांदेडसाठी आणखी निधी देतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय समारोपात नवाब मलिक यांनी भारतात हिंदीनंतर बोलली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा उर्दू आहे तर महाराष्ट्रात मराठीनंतर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा उर्दू असल्याचे ते म्हणाले. उर्दू भाषा लष्करी असली तरीही ती बोलीभाषा पुढे बनली. नांदेडमध्ये झालेल्या उर्दू घराच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणावे. चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी उर्दू घराला दिलीपकुमार यांचे नाव देण्याची मागणी केली. यावर बोलताना दिलीपकुमार यांनी उर्दू भाषेतून शिक्षण घेतल्याचे त्यांनी सांगितले. उर्दूसह इंग्रजी, हिंदी आदी भाषावरही त्यांचे प्रभुत्व होते. सामाजिक चळवळीतही त्यांनी चांगले काम केले. त्यांनी दिलीपकुमार यांचे नाव नांदेडच्या उर्दूघरला देण्याची मागणी मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजीमंत्री नसीमखान, आमदार मोहन हंबर्डे यांचेही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.
चौकट--------------
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
नांदेडमध्ये मुलींचे वसतिगृह आहे. मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी चव्हाण यांनी केली. त्यावेळी मुलांचे वसतिगृह देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्याचवेळी ८ लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल. मनपा हद्दीत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला ३५ हजार तर जिल्ह्याच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही यावेळी नवाब यांनी केली.