नांदेडमधील उर्दृ घर लवकरच सुरू होणार -अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:48+5:302021-02-11T04:19:48+5:30
नांदेडमधील उर्दू घर, तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दफनभूमी, सद्भावना सभागृहाचे कामकाज यासंदर्भात बुधवारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक ...
नांदेडमधील उर्दू घर, तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दफनभूमी, सद्भावना सभागृहाचे कामकाज यासंदर्भात बुधवारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, सहसचिव तडवी आदींची यावेळी उपस्थिती होती.
मलिक म्हणाले, नांदेडमधील मदिनानगर येथे उर्दू घराचे बांधकाम करण्यात आले आहे. याचे परिचालन करण्यासाठी उर्दू अकादमीच्या स्तरावर स्थानिक समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्यामार्फत उर्दू घर उपक्रम चालविण्यात येईल. ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यासह सामाजिक उपक्रमासाठी उर्दू घराचा उपयोग होणार आहे.
चव्हाण म्हणाले, उर्दू घराच्या सुनियोजित परिचलनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे साह्य घेण्यात यावे. ग्रंथालयाचा लाभ सर्वांना पूर्णवेळ व्हावा, यासाठी विद्यापीठाचे आणि मनुष्यबळासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात यावे. उर्दू घरामध्ये उर्दू भाषेच्या प्रसारासाठी वर्ग सुरू करण्यात यावेत, तसेच शिक्षणविषयक उपक्रम सुरू करावेत.
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत धनेगाव येथे सद्भावना मंडप बांधकामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या कामास चालना देण्यात यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली.