चांगल्या समाज निर्मितीसाठी सोशल मीडियाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:42 AM2018-03-16T00:42:42+5:302018-03-16T00:42:47+5:30

सध्या तरूणवर्गात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु, या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

Use social media to create good society | चांगल्या समाज निर्मितीसाठी सोशल मीडियाचा वापर करा

चांगल्या समाज निर्मितीसाठी सोशल मीडियाचा वापर करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सध्या तरूणवर्गात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परंतु, या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्या वतीने येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमांतर्गत संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
सोशल मीडियाच्या माध्यमांमुळे संदेशाची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या सामाजिक माध्यमांचा प्रभावही तितकाच वाढत आहे. अनेकांशी जोडण्याच्या या नवीन माध्यमाचा वापर चांगल्या समाजोपयोगी योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केला गेला तर खऱ्या अर्थाने चांगली समाज निर्मिती होऊ शकते, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
‘महामित्र’ हा शासनाचा स्तुत्य उपक्रम असून यामुळे सोशल मीडियातील प्रभावी युवक-युवती शासनाशी जोडले जात आहेत. या व्यक्तींनी भविष्यात चांगले संदेश, चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावा, अशी सुचना जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली.
दरम्यान, केवळ प्राप्त झालेले संदेश कोणताही विचार न करता फारवर्ड करण्याची चुकीची पद्धत बदलून कोणताही संदेश विचार करुन फारवर्ड केल्यास आपण अधिक कार्यक्षमपणे समाजाला दिशा देऊ शकतो. तसेच जलयुक्त शिवार अभियान, तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमातून जलसंवर्धनाची चळवळ जिल्ह्यात सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिली. तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनीही यावेळी सोशल मीडियाचा वापर समर्पक समाजाच्या उद्धारासाठी करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्ह्यातील नऊ क्षेत्राच्या टॉप सहभागींचे नऊ संवादसत्र झाले. संवादसत्रासाठी डॉ. कल्पना बेलोकर, व्ही. एम. कल्याणपाड, एस.एस. दासरवार, प्रा. महेश मोरे, डॉ. भास्कर भोसले, डॉ. सुलभा मुळे, डॉ. वैजनाथ अनमुलवार, सुनिल हुसे, प्रा. सु. गं. जाधव, डॉ. एस. एस. सोळंके आणि माधव चुकेवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर आणि अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख विजय मोरगुलवार यांनी केले.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. हारुण शेख, प्रवीण बिदरकर, महमंद युसूफ, विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, बालनरस्या, अशिष चौधरी, राम साळवेश्वरकर, प्रवीण श्रीमनवार, पांडुरंग बुद्धेवार, विष्णू माने आदींसह संस्थेच्या कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Use social media to create good society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.