नांदेडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडून २६ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:53 PM2019-12-16T13:53:44+5:302019-12-16T13:55:11+5:30
याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड : शहरातील भावसार चौक भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून २६ लाख ३० हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शनिवारी भावसार चौक भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. यातील २६ लाख ३० हजार रुपये लंपास केले. चोरट्याने यावेळी सीसीटीव्हीचेही नुकसान केले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहर व जिल्ह्यात दररोज चोरी अन् लूटमारीच्या घटना घडत आहेत. वृद्ध महिला अन् पुरुषांना सकाळच्या वेळी चोरट्यांकडून टार्गेट करण्यात येत आहे. त्याचबरोबर सीआयडी किंवा पोलीस असल्याचे सांगून लुबाडण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी शहराच्या विविध भागांत पोलीस चौक्या उभारल्या आहेत. परंतु त्यामुळे चोरट्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.