उत्तमराव राचोटकर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:58+5:302021-01-04T04:15:58+5:30
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरपाते व सोमाजीवार यांनाही निरोप देण्यात आला. याप्रसंगी श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र नांदेडचे ...
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सरपाते व सोमाजीवार यांनाही निरोप देण्यात आला. याप्रसंगी श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र नांदेडचे संचालक, प्रबंधक, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र नाभिक मंडळाचे कार्यकर्ते व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नांदेड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय पिछडा शोषित ओबीसी संघटना, शाखा नांदेडच्या वतीने महात्मा फुले पुतळा, आयटीआय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गोल्ला गोलेवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवाड, पिछडा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष एस. जी. माचनवार, विभागीय उपाध्यक्ष गोविंद फेसाटे, जिल्हाध्यक्ष ॲड. प्रदीप राठोड, कर्मचारी संघटनेचे रवींद्र बंडेवार, हदगाव तालुकाध्यक्ष स्वप्निल रामगिरवार, प्रा. लक्ष्मण शिंदे, नंदकुमार कोसबतवार, राजेश चिटकुलवार, कृष्णराव चिंतलवार, बाबूराव माडगे, बालाजी थोठवे, रामचंद्र सावंत, चंद्रकला श्रीमंगले, संगीता राऊत, सुरश्री राऊत, बालाजी तेलंग, संजय मोरे, के. एस. हनुमते, प्रा. श्रीमंत राऊत, प्रा. बी. के. यशवंतकर, व्यंकटराव जाधव, हरी दामेकर, रवी कांबळे, महेश मुखेडकर, प्रा. मारोती लुटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.