जिल्ह्यात आज ६२ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:43+5:302021-07-04T04:13:43+5:30
रविवारी मनपा क्षेत्रातील शहरी रुग्णालय कौठा येथे ८० डोस, शहरी रुग्णालय, जंगमवाडी व दशमेश हॉस्पिटल येथे प्रत्येकी ५० डोस, ...
रविवारी मनपा क्षेत्रातील शहरी रुग्णालय कौठा येथे ८० डोस, शहरी रुग्णालय, जंगमवाडी व दशमेश हॉस्पिटल येथे प्रत्येकी ५० डोस, शहरी रुग्रालय, करबला व अरबगल्ली येथे प्रत्येकी ४० डोस, तर शहरी रुग्णालय, सांगवी येथे २० डोस कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
मनपा क्षेत्रातील स्त्री रुग्णालय, शहरी रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको या ७ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध आहेत. श्री गुरुगोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी रुग्णालय, कौठा, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या ९ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी ८० डोस उपलब्ध आहेत.
शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, कंधार, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, उमरी या १० केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस, तर उपजिल्हा रुग्णालय, देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी १०० डोस, तर ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ५० डोस उपलब्ध करून दिले आहेत. सर्व लसीकरण केंद्रांवर पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर ऑफलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यात २ जुलैपर्यंत ६ लाख २१ हजार २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर ३ जुलैपर्यंत कोविशिल्डचे ४ लाख ९२ हजार ९३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ५५ हजार ६६० डोस याप्रमाणे एकूण ६ लाख ४८ हजार ५९० डोस प्राप्त झाले आहेत.