जनावरांचे लसीकरणही थांबवले, अहवालही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:11+5:302021-06-24T04:14:11+5:30
सध्या कोरोनाचे संकट असून, या परिस्थितीत आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता, शेतकरी पशुपालक यांना वेठीस न धरता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न ...
सध्या कोरोनाचे संकट असून, या परिस्थितीत आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता, शेतकरी पशुपालक यांना वेठीस न धरता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची भूमिका संघटनेची होती. मात्र प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून लसीकरण, ऑनलाइन, मासिक तसेच वार्षिक अहवाल थांबवणे बंद केले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात गुरांचे लसीकरण थांबले आहे. पावसाळ्यात जनावरांना विविध आजार होतात. जिल्ह्यात १०३ पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व लसीकरणावर बहिष्कार घातल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सर्व पंचायत समित्यांना पशु चिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनावर आता तोडगा कधी निघेल, याकडे लक्ष लागले आहे.