दिग्रस आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:15+5:302021-04-04T04:18:15+5:30

मटका अड्डे बंद करा बोधडी - शहरासह इंजेगाव फाटा येथे मटका अड्डे जोरात सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही शेकडोंचा जमाव ...

Vaccination at Digras Health Sub-center | दिग्रस आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

दिग्रस आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

Next

मटका अड्डे बंद करा

बोधडी - शहरासह इंजेगाव फाटा येथे मटका अड्डे जोरात सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही शेकडोंचा जमाव येथे जमा होतो. पोलिसांनी हे मटका अड्डे बंद करावेत, अशी मागणी होत आहे. याशिवाय पत्त्याचा क्लब, अवैध देशी दारू दिवसेंदिवस सुरू आहे. इंजेगाव फाटा येथे मटक्याचा बाजार भरला. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.

लसीकरणासाठी ग्रामपंचायतकडून प्रबोधन

बारड - कोरोना लसीकरणासाठी बारड ग्रामपंचायतीकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. प्रभागनिहाय जनजागृती सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक करण्यासाठी कशी काळजी घेण्यात येत आहे याची माहिती दिली जाते. ज्येष्ठ नागरिक माणिक वसुमते, उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी कोरोना लस घेऊन ती सुरक्षित असल्याचे सांगितले. जनजागृतीसाठी सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, तंटामुक्ती अध्यक्ष नरहरी आठवले, ग्रा.पं. सदस्य पंडित देशमुख, तलाठी अंजली बार्शीकर, ग्रा. पं. सदस्य गजानन कतरे, दिगंबरराव टीप्परसे, यशवंत पवार, शरद कवळे, विलास देशमुख, पो. पा. यशवंतराव लोमटे आदी उपस्थित होते.

धोंडीबा मोरे यांचे निधन

पानशेवडी - येथील ज्येष्ठ नागरिक धोंडीबा बाजीराव मोरे (वय ९५) यांचे ३ एप्रिल रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

माधवराव देवकत्ते यांचे निधन

मुक्रमाबाद - रावी (ता. मुखेड) येथील माधवराव देवकत्ते (वय ९०) यांचे वृद्धापकाळााने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. मौजे रावी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चुडावा पोलीस स्टेशनचे सपोनि शिवाजीराव देवकत्ते यांचे ते वडील होत.

Web Title: Vaccination at Digras Health Sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.