पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:40 PM2018-11-25T23:40:10+5:302018-11-25T23:41:47+5:30

परंतु एकटा रोखपाल एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार करु शकतो काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो़ अद्याप रोखपालाला अटक झाली नसून

Various entries on the invoices, impairment | पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार

पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार

Next
ठळक मुद्देआरटीओ : आरोपी रोखपाल सापडेनाअटकेनंतर या प्रकरणाचे गूढ उकलणार

नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपालाने ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आरोपी रोखपालाने तडजोड शुल्काच्या तीन वेगवेगळ्या पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन हा अपहार केल्याचे पुढे आले आहे़ परंतु एकटा रोखपाल एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार करु शकतो काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो़ अद्याप रोखपालाला अटक झाली नसून त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे़
नवीन नांदेड भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपालाने पावतीपुस्तकात खोट्या नोंदी करुन ५६ लाख ९ हजार ५० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ याप्रकरणी रोखपाल झेड़एम़शेख याच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ १६ आॅक्टोबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मागणी शुल्क आणि तडजोड शुल्क मानवीय पद्धतीने जारी करुन स्वीकारली़ रकमेचा भरणा करण्यासाठी असलेल्या पावती पुस्तकातील तीन पावत्यांच्या नोंदीमध्येच या घोटाळ्याचे मूळ आहे़ मागणी किंवा तडजोड शुल्क देणाऱ्याला आरोपी रोखपाल हा पूर्ण रकमेची पावती देत असे़ तर कार्यालयात जमा करण्यात येणाºया पावतीवर मात्र आपल्याला वाट्टेल ती रक्कम टाकून त्याचा भरणा करीत होता़
अशाप्रकारे पाच हजारांची पावती कधी तर पन्नास, पाचशे रुपयांचीच झाली़ अशाप्रकारे केलेल्या घोटाळ्याबाबत कुणकुण लागताच शेखकडून खुलासा मागविण्यात आला होता़ शेख याने पावणेसात लाखांच्या रकमेचा भरणाही केला़ परंतु, त्यानंतरची रक्कम तो भरु शकला नाही़ त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचे त्याने केले काय? या प्रकरणात तो एकटाच होता की अन्य कोणी साथीदार आहे? या बाबींचा उलगडा शेख याच्या अटकेनंतरच होणार आहे़ परंतु या प्रकारामुळे आरटीओतील अनागोंदी समोर आली आहे़

Web Title: Various entries on the invoices, impairment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.