नांदेड जिल्ह्यात विविध शाळांना उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:28 AM2019-06-18T00:28:09+5:302019-06-18T00:29:51+5:30

जिल्ह्यात शाळांना १७ जून रोजी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.

various schools started enthusiastically In the Nanded district | नांदेड जिल्ह्यात विविध शाळांना उत्साहात प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात विविध शाळांना उत्साहात प्रारंभ

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागतपहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप

नांदेड : जिल्ह्यात शाळांना १७ जून रोजी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी या विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. जिल्ह्यात पहिल्या दिवशी १९ लाख पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप करण्यात येतात. ४ लाख २ हजार ५८६ विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी शालेय पुस्तक वाटपास प्रारंभ झाला.
जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात ७७ हजार ९५९, उमरी तालुक्यात ७० हजार ३५५, कंधार तालुक्यात १ लाख ६८ हजार ८३१, किनवट तालुक्यात १ लाख ७९ हजार ८१७, देगलूर तालुक्यात १ लाख ४४ हजार ६२०, धर्माबाद तालुक्यात ५९ हजार ३२७, नांदेड तालुक्यात १ लाख १३ हजार १७७, नायगाव तालुक्यात १ लाख १६ हजार ८९१, बिलोली तालुक्यात १ लाख २९९, भोकर तालुक्यात १ लाख ६ हजार ८९४, माहूर तालुक्यात ७५ हजार ३५८, मुखेड तालुक्यात २ लाख २४ हजार ९१३, मुदखेड तालुक्यात ८६ हजार ९८०, लोहा तालुक्यात १ लाख ८० हजार ७१५, हदगाव तालुक्यात १ लाख ८२ हजार ७११ आणि हिमायतनगर तालुक्यात ७६ हजार ८२४ पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. १९ लाख ६५ हजार ६७१ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. पहिल्या दिवशी पुस्तक वाटपाला प्रारंभ करण्यात आला आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी नांदेड तालुक्यातील वाघी जि. प. शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू भोसले, सत्यनारायण शर्मा, सुभाष राठोड, खोब्राजी भोसले, बाळू लोकरे, संकेत जानकर यांचीही उपस्थिती होती. मुख्याध्यापक, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना फुले देऊन पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, हदगावचे गटशिक्षणाधिकारी ससाणे, किनवटचे गटशिक्षणाधिकारी पवणे, हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी संघपवाड, बाल रक्षक समन्वयक दादाराव सिरसाट, समवेक्षित शिक्षण समन्वयक पी.एच. बोडनाडे यांनीही भेट दिल्या.
बिलोली तालुक्यातील अर्जापूर जिल्हा परिषद शाळेस विलास ढवळे यांनी भेट दिली. हिमायतनगर तालुक्यातील पोटा जि. प. शाळेस अर्चना बागवाले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Web Title: various schools started enthusiastically In the Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.