नांदेडमधील भाजी मार्केटचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:34 AM2018-05-25T00:34:11+5:302018-05-25T00:34:11+5:30

विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांना बोंढार येथील पर्यायी जागा दाखविण्यात आली़ परंतु व्यापा-यांनी या जागेला विरोध दर्शविल्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़

Vegetable market in Nanded remained unchanged | नांदेडमधील भाजी मार्केटचा तिढा कायम

नांदेडमधील भाजी मार्केटचा तिढा कायम

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाने सुचविली बोंढारची जागा : मलनिस्सारण केंद्राच्या घाणीमुळे व्यापाऱ्यांचा मात्र विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्यामुळे महापालिकेने म्हाळजा येथील फळ व भाजीपाला मार्केट पाडण्याची कारवाई केली होती़ मनपाच्या या कारवाईचा व्यापा-यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती़ त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांना बोंढार येथील पर्यायी जागा दाखविण्यात आली़ परंतु व्यापा-यांनी या जागेला विरोध दर्शविल्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़
म्हाळजा येथील जवळपास नऊ हजार चौ़मी़पेक्षा जास्त जागेवर फळ व भाजीपाला विक्रेत्यासाठी मार्केट बनविण्यात आले होते़ परंतु भाजीपाला आणि फळ मार्केटमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता़ त्यानंतर १२ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेने नोटीस बजावून मार्केट हटविण्यास सांगितले होते़ त्यानंतर ९ मे रोजी मनपाने या मार्केटवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले़ मार्केट पाडल्यामुळे भाजीपाला आणि फळविक्रेत्यांमध्ये संताप होता़ महापालिकेसमोर त्यांनी आंदोलनही केले होते़ मार्केटची नुकसान भरपाई द्यावी व पुनर्वसन करण्याची मागणी केली होती़ माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांचीही शिष्टमंडळाने भेट घेवून आपली कैफियत मांडली होती़
त्यानंतर खा़ चव्हाण यांनी मनपा अधिका-यांची बैठक घेवून व्यापा-यांना शहरात पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानुसार बुधवारी व्यापा-यांचे शिष्टमंडळ आणि मनपा आयुक्त लहूराज माळी व इतर अधिकारी बोंढार येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते़ मनपा अधिका-यांनी व्यापा-यांना मार्केटसाठी ही जागा सुचविली़ परंतु मलनिस्सारण प्रकल्पाच्या घाण वासामुळे या ठिकाणी फळ आणि भाजीपाला मार्केट सुरु करणे अशक्य असल्याचे व त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे सांगत व्यापाºयांनी या जागेला विरोध दर्शविला़
त्याचबरोबर रात्रीच्या वेळी या ठिकाणी सुरक्षिततेच्या कुठल्याच उपायोजना नसून डासांचा प्रार्दुभावही असतो़ त्यामुळे बहुतांश व्यापाºयांनी बोंढार येथील जागेबाबत नाराजी दर्शविली़ त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या जागेचा तिढा अद्यापही कायमच आहे़ यावर मनपा प्रशासन आता काय तोडगा काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
२०११ मध्येच दिला होता या जागेचा प्रस्ताव
२०११ मध्येही महापालिकेकडून बोंढारची जागा देण्याबाबत प्रस्ताव आला होता़ आता पुन्हा तोच प्रस्ताव आणण्यात आला आहे़ परंतु या ठिकाणी घाणीमध्ये मार्केटला व्यापा-यांचा विरोध आहे़ त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने येत्या तीन दिवसात या भागातील स्वच्छता करुन रस्त्याचे नकाशे दाखविण्यात येणार आहे़ त्यानंतर या विषयावर काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे़
स्वार्थापोटी जागेचा खेळ सुरु-फारुख अहमद
माजी मुख्यमंत्री खा़चव्हाण यांच्या सुचनेवरुन महापालिकेने पर्यायी जागा देण्यास तयार झाली़ सुरुवातीला माळटेकडी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती़ परंतु ही जागा देण्यास नगरसेवक विरोध करीत आहेत़ कारण या ठिकाणी उद्यानाचा प्रस्ताव आहे़ उद्यानाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी व त्यातून मिळणारा मलिदा या स्वार्थापोटी हा विरोध सुरु असल्याचे कॉफ़ारुख अहमद म्हणाले़

Web Title: Vegetable market in Nanded remained unchanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.