भाजीपाल्याचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:59+5:302020-12-05T04:28:59+5:30
तर शेतामध्ये तुरीच्या शेंगा, हरभराची भाजी सर्व सामान्यांना मोफत मिळत असल्याने आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीला ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे भाव ...
तर शेतामध्ये तुरीच्या शेंगा, हरभराची भाजी सर्व सामान्यांना मोफत मिळत असल्याने आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीला ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. कांदे आणि लसूनचे भाव ( दर ) वगळता इतर भाजीपाला मात्र पूर्वी ८० ते १०० रुपये दराने खरेदी करावा लागणारा आता मात्र ३० ते ४० रुपया या भावामध्ये मिळत असल्याने कमी पैशात भरपूर भाजीपाला खरेदी करता येत आहे. तर भाजीपालाचे दर गडगड ल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा वाहतूक व मजुरीचा खर्च पण निघत नसल्याचे व्यापारी बोलून दाखवित आहेत .
तालुकाध्यक्षपदी शिवलाड तर उपाध्यक्षपदी पिरसाब यांची निवड
बिलोली : शहर मिनरल वॉटर सप्लायर्स असोसिएशनच्या सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी विशाल शिवलाड तर उपाध्यक्षपदी पीरसाब यांची नुकतेच निवड करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष रणविरसिंह चौव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत तालुकाध्यक्षपदी शिवलाड तर उपाध्यक्षपदी पीरसाब,कोषाध्यक्षपदी संतोष चिकनेकर आदी निवडी करण्यात आल्या आहेत. ह्या निवडीबद्दल नगराध्यक्ष मारोती पटाईत, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, गंगाधर पप्पुलवार, नगरसेवक अरुण उप्पलवार, अल्पसंख्याकचे वलिओद्दिन फारुखी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.