नांदेडमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांचे व्यवहारबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:38 AM2018-03-29T00:38:06+5:302018-03-29T00:38:06+5:30
प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले, शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यामुळे प्लास्टिक विक्री करणाºयांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ नांदेडात आजघडीला प्लास्टिकचे सात कारखाने आहेत़ तर प्लास्टिक विक्री करणारी नांदेड शहरात मोठी २२ दुकाने आहेत़ तर त्यांच्याकडून माल खरेदी करुन किरकोळ विक्री करणाºयांची संख्या जवळपास अडीचशेच्या घरात आहे़
प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे या सर्वांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे या विषयावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, प्लास्टिकबंदी निर्णयाच्या विरोधात नांदेडात गेल्या पाच दिवसांपासून विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले असल्याची माहिती आहे. शिष्टमंडळात ललीत तापडीया, मानधनी, कपिल परवाल, अलीम, संजय पटवारी, राजेश्वर प्लास्टिक यांच्यासह अनेक व्यापाºयांचा समावेश होता़ दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि महापौरांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे़
जिल्हाधिकारी, महापौर यांची आज घेणार भेट
प्लास्टिकसंदर्भात गुरुवारी संघटनेचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी आणि महापौर यांची भेट घेणार असून विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे़
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून व्यापाºयांनी शहरातील दुकाने बंद ठेवली आहेत.
प्लास्टिक बंदीचा फटका
शासनाने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतल्यामुळे प्लास्टिक विक्री करणाºयांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून कारखानदारांसह विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.