वेणीकरांच्या जामिनावर ३ जुलै रोजी होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:00 IST2019-06-30T00:58:46+5:302019-06-30T01:00:06+5:30
कोट्यवधी रुपयांच्या कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी आणि तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे़ या अर्जावर शनिवारी युिक्तवाद करण्यात आला.

वेणीकरांच्या जामिनावर ३ जुलै रोजी होणार सुनावणी
नांदेड : कोट्यवधी रुपयांच्या कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी आणि तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे़ या अर्जावर शनिवारी युिक्तवाद करण्यात आला. आता ३ जुलै रोजी युक्तिवादानंतर यावर निर्णय अपेक्षित आहे़
कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी अजय बाहेती, कंत्राटदार पारसेवार यांच्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे़ सध्या हे आरोपी हर्सूल कारागृहात आहेत़ या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकासमोर या घोटाळ्याची सर्व साखळी शोधण्याचे आव्हान आहे़ त्यातच तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ या अर्जावर शनिवारी युक्तिवाद करण्यात आला़
वेणीकर यांच्या वकिलांनी जामीन देण्यात यावा या विषयावर युक्तिवाद केला़ त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर ३ जुलैला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले़ ३ जुलै रोजी वेणीकर यांच्या जामिनाला आक्षेप नोंदविणाºया मोहम्मद रफिक यांचे वकील अॅड़ इद्रीस कादरी यांनाही न्यायालय युक्तिवाद करण्याची संधी देवू शकते़ त्यानंतर वेणीकर यांच्या जामिनाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे़
दरम्यान, न्यायालयाने मोहम्मद रफीक यांना या प्रकरणात पक्षकार बनविण्याची विनंती मान्य केली आहे़ तसेच रफीक यांनी वेणीकर यांच्याबाबतीत सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या से रिपोर्टला आक्षेप घेतला आहे़ दिवसेंदिवस या प्रकरणाचा गुंता वाढत चालला असून आता ३ जुलैला जामीन अर्जावर होणाºया सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
उच्च न्यायालयातही सुनावणी
याचिकाकर्ते महमद अरीफ यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. ५ जुलै रोजी या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये तपासीक अधिकारी नेमकी काय बाजू मांडतात, यावरुन पुरवणी शपथपत्र किंवा आमची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात येणार आहे.