खड्ड्यांचा बळी! जीप समोरच्या मोपेडला धडकत ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू
By श्रीनिवास भोसले | Published: August 20, 2023 11:22 AM2023-08-20T11:22:39+5:302023-08-20T11:23:14+5:30
चकाचक रस्त्यावर अचानक खड्ड्याचा रस्ता आल्याने सदर अपघात झाला
- गोविंद टेकाळे
अर्धापूर : नांदेड-अर्धापूर रस्त्यावर वसमत फाटा चौकीजवळ खड्डेमय रस्त्याने दोघांचा बळी घेतला. सदर घटना दि.१९ शनिवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. मयत दोघे खडकपुरा येथील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
नांदेड - अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर वसमत फाटा चौकी जवळ खड्डेमय रस्त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दि.१९ ऑगस्ट शनिवारी रोजी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास मालवाहतूक ट्रक (आर.जे.१७ जि.ए.५५०१) व त्या मागे स्कुटी स्कुटी (एम एच २६ ए.पी.८८४०) खड्डे असल्याने संथ गतीने जात होते. पाठीमागुन भरधाव येणारी स्कॉर्पिओ एम.एच.३८ डब्लु २२७७ ही स्कुटीसह ट्रकला मागुन धडकले यात स्कुटीचा चुराडा झाला स्कुटीवरील शहबाज खान युसुफ खान (पेंटर ) (वय ३२ वर्ष) , युनूस खान युसुफ खान (मेकॅनिक) (वय २६ वर्ष) दोघे रा खडकपुरा, नांदेड यांना जबरदस्त मार लागल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक नईम शेख, वामन कोकाटे, जमादार ज्ञानेश्वर तिडके, गजानन कदम, गोविंद कल्याणकर, गजानन डवरे, वसंत सिनगारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करून मयतांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविले. चकाचक रस्त्यावर अचानक खड्ड्याचा रस्ता आल्याने सदर अपघात झाला असून संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले आहे.
नॅशनल हायवेवर अचानक खड्ड्याचा रस्ता देतो अपघाताला निमंत्रण...
नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. हाय फाय रस्तात अचानक खड्डेमय रस्त्याआल्याने अपघात झाला आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराच्या हलगर्दीपणाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अनेकांचे निरापराध बळी जात आहेत.