अवघ्या एका मताने साकारला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:24+5:302021-01-21T04:17:24+5:30

* * * * * * * * * *डोणगावात महिला उमेदवारास टपाली मतदानाने लागला गुलाल* कासराळी - ईव्हीएम ...

Victory was achieved by just one vote | अवघ्या एका मताने साकारला विजय

अवघ्या एका मताने साकारला विजय

googlenewsNext

* * * * * * * * * *डोणगावात महिला उमेदवारास टपाली मतदानाने लागला गुलाल*

कासराळी - ईव्हीएम मशीन मधील ४ मतांच्या पिछाडीनंतर ६ टपाली मतदानाच्या बळावर डोणगाव खु. येथील एका महिला उमेदवारांस सावरले आणि विजयाचा गुलाल लागला आहे.अत्यंत उत्कंठावर्धक लढतीचा शेवट एका मताच्या विजयाने झाला आहे.

डोणगाव खु. येथील वाॅर्ड क्र.१ मधील उमेदवार सावित्राबाई नारायण मठ्ठमवाड या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात विरोधी पॕॅनलचे महानंदाबाई चंपतराव पाटील या उमेदवार होत्या. दि. १८ रोजी प्रत्यक्ष ईव्हीएमवरील मतमोजणीत जो निकाल आला त्यात सावित्राबाई मठ्ठमवाड यांना २२२ मते मिळाली होती. तर महानंदाबाई यांना २२६ मते मिळाली होती. मात्र ७ टपाली मतांपैकी ६ टपाली मते सावित्राबाई यांना तर एक मत महानंदाबाई यांना मिळाले.त्यांचे एकूण मतदान २२८ झाले तर महानंदाबाई यांना १ टपाली मत मिळाल्याने त्यांना २२७ एकूण मते मिळाली आहेत. अवघ्या एका मताने मठ्ठमवाड यांचा विजय झाला असून पिछाडीवर असतानाही ६ टपाली मताने विजयाचा गुलाल लागला आहे. डोणगावात ९ पैकी ९ ही उमेदवार बालाजी माळेगावे यांच्या गटाची आले आहेत. टपाली मतदानाने मठ्ठमवाड यांचा विजय सुकर झाल्याने त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी आणि नातलगांनी मतमोजणी केंद्रातच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Web Title: Victory was achieved by just one vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.