Video: 'जय जय महाराष्ट्र माझा...; KCR यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्र गीताने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 05:11 PM2023-02-05T17:11:53+5:302023-02-05T17:29:27+5:30
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे.
नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव(KCR) यांनी नांदेडमध्ये जाहिर सभा घेऊन महाराष्ट्राच्याराजकारणात एंट्री घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून 'भारत राष्ट्र समिती' केले आहे. या नामकरणाच्या दिवशी त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची पहिलीच सभा महाराष्ट्रात झाली. दरम्यान, त्यांच्या सभेची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेड येथून महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते गुरुद्वारा येथे पोहोचले. श्री सचखंड गुरुद्वारा येथे माथा टेकून केसीआर हे सभास्थळाकडे रवाना झाले. केसीआर यांना ऐकण्यासाठी सभास्थळी हजारो नागरिक जमले होते. यावेळी सभेची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा...या गाण्याने झाली.
वाचा सविस्तर बातमी- 'शेतकऱ्यांनो आता तुम्हीच आमदार-खासदार व्हा'; KCR यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री...
आजच्या सभेसाठी भारज राष्ट्र समिती पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण नांदेड शहर गुलाबी झाले होते. बीएसआर पक्षाच्या गुलाबी रंगाच्या ध्वज सर्वत्र झळकत आहेत. ठिकठिकाणी लावलेले होर्डीग, आकाशातील गॅस बलून आणि केसीआर यांची प्रतिमा असलेले उंच कट आऊटने सर्वांचे लक्ष वेधून घेत. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसापासून बीसीआरचे नेते तळ ठोकून सभेची तयारी करत होते.