Video: नांदेडमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले, मध्यवस्तीतील पाच दुकाने फोडली
By प्रसाद आर्वीकर | Published: November 4, 2022 04:33 PM2022-11-04T16:33:14+5:302022-11-04T16:34:02+5:30
ज्वेलरीच्या दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नांदेड : शहरातील मध्यवस्तीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. एका दुकानात चोरीचा प्रयत्न करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या वाढल्या आहेत. इतवारा हद्दीत शुक्रवारी पहाटे चोरीचा हा प्रकार घडला. नोमुलवार मेडिकल, एच. रहीम, रहीम, जय गोपाळ कृष्ण कुमार जुना मोंढा टॉवर जवळ आणि लोहार गल्लीत अग्रवाल या चार दुकानांचे शटर वाकवून चोरी झाली आहे. तसेच वजीराबाद हद्दीत भर रस्त्यावरील जैन मंदिरा समोरील खुशी इमिटेशन ज्वेलरी हे दुकान चोरट्यांनी फोडले आहे. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण केले होते. दरम्यान चार दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
नांदेड: चोरट्यांनी शहरातील मध्यवस्तीतील पाच दुकाने फोडली, ज्वेलरीच्या दुकानात चोरीकरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/Z0MZvtM56Q
— Lokmat (@lokmat) November 4, 2022
चोरटे सीसीटीव्हीत
दरम्यान, एका ज्वेलरीच्या दुकानात चोरीचा प्रयत्न करीत असताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध आहेत.