वंचित शेतकऱ्यांसाठी ११ ते १३ डिसेंबरपर्यंत गावनिहाय कॕॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:37+5:302020-12-11T04:44:37+5:30
बिलोली : शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. मात्र, बिलोली तालुक्यातील सगरोळी, ...
बिलोली : शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. मात्र, बिलोली तालुक्यातील सगरोळी, लोहगाव, आरळी जि.प. गटातील १ हजार २१४ शेतकऱ्यांच्या आधार कार्डात तफावत असल्याने सदर योजनेपासून वंचित राहावे लागल्याने अशा शेतकऱ्यांकरिता ११ ते १३ डिसेंबरपर्यंत गावनिहाय कॕॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी बिलोली तालुक्यातील तब्बल २० हजार १३२ शेतकऱ्यांनी २०१९ मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला आहे; परंतु १ हजार २१४ शेतकऱ्यांच्या अर्जापुढे ऑनलाइनवर स्टॉप पेमेंट, अशी टिपणी येत असल्याचे कारण पुढे करीत संबंधितांनी शेतकऱ्यांकडून अनेकदा विविध बँक शाखांचे खाते क्रमांक मागविण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप खडकूही जमा करण्यात आला नाही. केवळ आधार दुरुस्ती करून अपलोड करण्याचा सल्ला देऊन घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्ज केला त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६,००० रुपये जमा झाले आहेत. मात्र, वंचित शेतकऱ्यांची अद्यापही उपेक्षाच होत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयाकडून ११ ते १३ डिसेंबर रोजी वसुली कॕॅम्पचे आयोजन करण्यात आले असून, प्रधानमंत्री सन्मान योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत ठेवून आधार कार्डचा तपशील व त्रुटी दुरुस्त करून घेण्याचे आवाहन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.
बिलोली तालुक्यात गावनिहाय कॕॅम्प राबविण्यात येणार असून, यात प्रामुख्याने तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहेत.
फैजल सिद्दीकी प्रथम
किनवट : कुलिननतर्फे पुणे येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र आयकॉन २०२० स्पर्धेत नांदेड येथील फैजल सिद्दीकी याने प्रथम क्रमांक, तर किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील अडीचवर्षीय चिमुकला रुद्रांश अनिकेत खांडरे याने द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२९ नोव्हेंबर रोजी कुलिननतर्फे महाराष्ट्र आयकॉन २०२० ची स्पर्धा पुणे येथे घेण्यात आली. स्पर्धेच्या आयोजक ममता राजपूत, शो-निर्माता जतीन गायकवाड, तसेच शो-दिग्दर्शक सुमेश राजपूत यांच्या हस्ते या स्पर्धेतील प्रथम विजेते फैजल सिद्दीकी, द्वितीय विजेते रुद्रांश अनिकेत खांडरे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.