नांदेडमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन; ३७६ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:49 AM2021-02-20T04:49:40+5:302021-02-20T04:49:40+5:30

बुधवारी झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी सकाळपासून महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची पथके रस्त्यावर उतरली होती. या पथकांनी मास्कविना वाहन चालवणे, बाजारात फिरणाऱ्या ...

Violation of Corona Rules in Nanded; Action against 376 persons | नांदेडमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन; ३७६ जणांविरुद्ध कारवाई

नांदेडमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन; ३७६ जणांविरुद्ध कारवाई

Next

बुधवारी झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी सकाळपासून महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची पथके रस्त्यावर उतरली होती. या पथकांनी मास्कविना वाहन चालवणे, बाजारात फिरणाऱ्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. यामध्ये क्षेत्रिय कार्यालय १ व २ अंतर्गत ३११ जणांविरुद्ध कारवाई करीत ३३ हजार रुपये दंड वसूल केला. वजिराबाद क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १५ जणांकडून तीन हजार रुपये, सिडको क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १८ जणांकडून दोन हजार २०० रुपये आणि शिवाजीनगर कार्यालयांतर्गत ५२ जणांकडून सात हजार १०० रुपये असा एकूण ३७६ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करताना ४५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.

महापालिकेच्या या कारवाईत आयुक्त डॉ. लहाने, अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, शिवाजीनगरचे क्षेत्रिय अधिकारी राजेश चव्हाण, अशोकनगरचे क्षेत्रिय अधिकारी डॉ. मिर्झा फरहतउल्ला, संजय जाधव, विलास गजभारे आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Violation of Corona Rules in Nanded; Action against 376 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.