विष्णूपुरी पुन्हा अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:11 AM2018-02-17T00:11:44+5:302018-02-17T00:12:06+5:30
महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़
विष्णूपुरी प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास ४० कोटींपेक्षा अधिकची थकबाकी होती़ त्यामुळे महावितरणने प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला होता़ त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प अंधारातच होता़ पावसाळ्याच्या काळात प्रकल्पाचे दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी दोन जनित्राची सोय करण्यात आली होती़ प्रकल्प भरल्यानंतर जनित्राच्या माध्यमातूनच दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत होते़ विजेवर किंवा जनित्राद्वारे दरवाजे उचलण्यासाठी सारखाच म्हणजे ४५ मिनिटांचा वेळ लागत होता़
त्यामुळे पाटबंधारे विभागानेही प्रकल्पाची थकबाकी देवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नव्हत्या़ मागील वर्षी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौºयावर आले होते़ यावेळी आ़ हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून थकबाकीतून थोडा दिलासा मिळाला होता़ त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच प्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ त्यात आता महावितरणने शून्य थकबाकीची मोहीम सुरु केली आहे़ या मोहिमेचा फटका प्रकल्पाला बसला आहे़ प्रकल्पाकडे आजघडीला असलेल्या १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे़ त्यामुळे प्रकल्प पुन्हा अंधारात गेला आहे़ त्यामुळे लोकप्रतिनिधींना थकबाकीसाठी पुन्हा राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे़ मात्र या ठिकाणी रात्रपाळीला कार्यरत असलेल्या पाटबंधारे व पोलीस कर्मचाºयांची त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे़
विष्णूपुरी प्रकल्पाकडे असलेल्या थकबाकीसंदर्भात यापूर्वीही अनेकवेळा महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता़ त्यामुळे पाटबंधारे विभागाने दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी जनित्र आणून ठेवले